Kane Williamson is ruled out IPL 2023 | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: हार्दिक पांड्याच्या गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन IPL मधून बाहेर

सकाळ ऑनलाईन टीम

Kane Williamson is ruled out IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

आयपीएलची सुरुवात शुक्रवारी एका शानदार उद्घाटन सोहळ्याने झाली. यानंतर मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. गुजरात फ्रँचायझीने 2023 च्या मिनी लिलावात 2 कोटी रुपयांची बोली लावून विल्यमसनला खरेदी केले होते.

IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात केन विल्यमसन क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाला होता. षटकार वाचवताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. आता गुजरात टायटन्सने विल्यमसन आयपीएलमधून बाहेर असल्याची माहिती दिली आहे. केन विल्यमसनने गुजरात टायटन्ससाठी CSK विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या सामन्यानंतरच तो लीगमधून बाहेर पडला. आता विल्यमसन मायदेशी परतणार आहे.

गुजरात टायटन्सचे निवेदनात म्हटले आहे की, “टूर्नामेंटमध्ये केनला इतक्या लवकर दुखापत झाली हे दुःखद आहे. आम्ही त्याला लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा देतो.

केन विल्यमसन अलीकडेच कोपराच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. या दुखापतीमुळे तो दोन वर्षे त्रस्त होता आणि आता त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. मात्र या दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचा तणाव नक्कीच वाढला असेल. कारण यंदाचा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे आणि विल्यमसनची दुखापत आणखी वाढली तर त्याला विश्वचषकात सहभागी होणे कठीण होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT