KL Rahul Strike Rate  esakal
IPL

KL Rahul Strike Rate : केएल राहुलची बॅटिंग पाहणं खूप कंटाळवाणं... इंग्लंडच्या माजी कर्णधाराची बोचरी टीका

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Strike Rate : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल राजस्थान विरूद्धच्या गेल्या सामन्यात संथ खेळीमुळे टीकेचा धनी झाला होता. ट्रेंट बोल्ट विरूद्ध राहुलला धावा करताना खूप अडचणी येत होत्या. यावरच इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक केविन पिटरसनने निशाणा साधला. त्याने केएल राहुलला चिमटा काढला.

यंदाच्या आयपीएल हंगामात केएल राहुलचे शॉट सिलेक्शन आणि बॉल टू रन धावा करण्याची रणनिती त्याच्या चांगलीच अंगलट येत आहे. तो ज्या स्ट्राईक रेटने धावा करतोय ते पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन नाखूष आहे. त्याने अत्यंत कठोर शब्दात केएल राहुलच्या फलंदाजीचे वाभाडे काढले.

पिटरन आयपीएल समालोचन करत असताना म्हणाला की, 'आतापर्यंत सर्वात कंटाळवाणे काय असले तर ती केएल राहुलची फलंदाजी पाहणे.'

लखनौ आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी लखनौचा कर्णधार केएल राहुलला चांगलेच जखडून ठेवले होते. बोल्टने टाकलेल्या पहिल्या सहा चेंडूवर राहुलला एक धाव देखील करता आली नव्हती. ट्रेंट बोल्टने सामन्याचे पहिले षटक निर्धाव टाकले. यानंतर राहुल वाईट पद्धतीने ट्रोल होऊ लागला होता.

केएल राहुलने पॉवर प्ले संपेपर्यंत रन टू बॉल पद्धतीने 19 धावाच केल्या होत्या. त्यानंतर राहुलने चार चौकार आणि एक षटकार मारत 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्याला जेसन होल्डरने 11 व्या षटकात बाद केले. राहुल बाद झाला त्यावेळी लखनौने 10.4 षटकात 1 बाद 82 धावा केल्या होत्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT