kkr captain nitish rana statement-after-lost-to-csk-ms dhoni ajinkya rahane shivam dube ipl 2023 cricket news in marathi  
IPL

IPL 2023: "टूर्नामेंटमध्ये आमची सुधारणा नाही..." पराभवानंतर कर्णधार नितीश राणा संघावर भडकला

धोनीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर KKR कर्णधार संतापला!

Kiran Mahanavar

IPL 2023 Nitish Rana : नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सला रविवारी चेन्नई सुपर किंग्जकडून 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनी दमछाक केली आणि त्यांना 20 षटकांत 8 बाद 186 धावाच करता आल्या.

सामना गमावल्यानंतर नितीश राणा म्हणाला, "पराभव पचवणे कठीण आहे. 236 धावांचा पाठलाग करणे नेहमीच कठीण असते, विशेषत: जर तुम्ही पॉवरप्लेमध्ये धावा केल्या नाही त्यावेळी. आमचा संघ चुकांमधून धडा घेत नाही. एवढ्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये एवढ्या मोठ्या संघांविरुद्ध आम्ही केलेल्या चुका आम्ही पुन्हा करत आहोत, ही एक समस्या आहे. स्पर्धेतील आमची कामगिरी सुधारत नाही.

राणा पुढे म्हणाला, या खेळपट्टीवर 235 धावा देणे मान्य नाही. तथापि रहाणेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे श्रेय त्याला द्यावे लागेल.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या 16व्या मोसमातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या तसेच आयपीएल संघाने ईडन गार्डन्सवर केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी कोलकाताने 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध या मैदानावर 2 बाद 232 धावा केल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. त्यांना 20 षटकांत 8 बाद 186 धावाच करता आल्या. जेसन रॉय (61) आणि रिंकू सिंग (नाबाद 53) यांनी चांगली खेळी खेळली, पण ते त्यांच्या संघासाठी कामी आले नाहीत. चेन्नईचा हा सलग तिसरा विजय आहे तर कोलकाताचा हा सलग चौथा पराभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT