KKR Team Flight Diverted News Marathi sakal
IPL

IPL 2024 मधील मोठी बातमी! खराब हवामानामुळे 'या' टीमचे खेळाडू फ्लाइटमध्ये अडकले, अन् रात्री उशिरा....

KKR Team Flight Diverted : आयपीएल 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

Kiran Mahanavar

KKR Team Flight Diverted : आयपीएल 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता. आणि या सामन्यानंतर केकेआर संघ चार्टर विमानाने लखनौहून कोलकात्याला रवाना झाला.

पण रात्री उशिरा खराब हवामानामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे विमान लँडिंग करू शकले नाही आणि टीम अजूनही कोलकात्याला पोहोचू शकली नाही.

सोमवारी कोलकात्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अशा परिस्थितीत खराब हवामानामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे चार्टर विमान यशस्वी लँडिंग करू शकले नाही. त्यामुळे विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते गुवाहाटीच्या दिशेने वळवण्यात आले.

कोलकाता नाईट रायडर्सने स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना हे अपडेट दिले. त्याच वेळी, रात्री 1:20 वाजता, कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर आणखी एक अपडेट दिला आणि सांगितले की गुवाहाटीहून कोलकाताकडे उड्डाण केल्यानंतर, केकेआर संघाला आणखी एक अयशस्वी लँडिंगला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचे विमान वाराणसीच्या दिशेने वळवण्यात आले.

केकेआर संघ कोलकाता कधी पोहोचेल?

कोलकाता नाईट रायडर्सने पहाटे 3 वाजता सोशल मीडियावर आणखी एक अपडेट शेअर केली. केकेआरने सांगितले की, त्यांची टीम सध्या वाराणसीतील एका हॉटेलमध्ये थांबली आहे. ती आज दिवसा कोलकाताला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला त्यांचा पुढचा सामना 11 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात चांगलीच राहिली आहे. आणि पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. केकेआरने या हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकले आहेत ज्यात त्याचे 16 गुण आहेत. आणि त्याचा नेट रन रेट 1.453 आहे. अशा स्थितीत पुढचा सामना जिंकून प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यावर त्याची नजर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT