IPL 2024 kkr vs srh  sakal
IPL

IPL 2024 kkr vs srh : कोलकाताचा चार धावांनी विजय ; आंद्रे रसेलचे तुफान, तर हैदराबादच्या क्लासेनचा झंझावात

शेरास सव्वाशेर असा खेळ झालेल्या आयपीएल सामन्यात २०९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताच्या आंद्र रसेलच्या २५ चेंडूत ६४ धावांचे तुफान आले. त्यानंतर हैदराबादच्या क्लासेनने २९ चेंडूत ६३ धावांचा झंझावात सादर केला.

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : शेरास सव्वाशेर असा खेळ झालेल्या आयपीएल सामन्यात २०९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताच्या आंद्र रसेलच्या २५ चेंडूत ६४ धावांचे तुफान आले. त्यानंतर हैदराबादच्या क्लासेनने २९ चेंडूत ६३ धावांचा झंझावात सादर केला. कोलकाता संघ १४व्या षटकांत सहा बाद ११९ आणि २०व्या षटकाअखेर सात बाद २०८ या सहा षटकांत आंद्रे रसेल नावाचे वादळ आले. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची चार बाद १४५ अशी अवस्था झाली होती; पण अखेरच्या षटकांत १३ धावांच्या आव्हानासमोर त्यांना आठच धावा करता आल्या. त्यामुळे कोलकाताने चार धावांनी सामना जिंकला.

क्लासेनने १९व्या षटकांत मिचेल स्टार्कची धुलाई केली आणि तब्बल २५ धावा कुटल्यामुळे सामना रंगतदार झाला. फिल साल्ट या सलामीवीराने अर्धशतक करूनही संकटात सापडलेल्या कोलकाता संघाला प्रथम रमणदीपने सावरले. त्यानंतर रसेल आणि रिंकू सिंग ३३ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली, त्यामुळे कोलकाता संघाला अपेक्षितही नसलेल्या द्विशतकी धावा करता आल्या. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नव्हता. याच रसेलने गोलंदाजीतही चमक दाखवताना दोन विकेट मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता : २० षटकांत ७ बाद २०८ (फिल साल्ट ५४ - ४० चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, रमणदीप सिंग ३५ - १७ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, रिंकू सिंग २३ - १५ चेंडू, ३ चौकार, आंद्रे रसेल नाबाद ६४ - २५ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार, टी. नटराजन ४-०-३२-३, मयांक मार्कंडे ४-०-३९-२) वि. वि. हैदराबाद : २० षटकांत ७ बाद २०४ (मयांक अगरवाल ३२, अभिषेक शर्मा ३२ - १९ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, हेन्रिक क्लासेन ६३ - २९ चेंडू, ८ षटकार, शाबाझ अहमद १६ - ५

चेंडू, १ चौकार, २ षटकार, हर्षित राणा ४-०-३३-३, आंद्रे रसेल २-०-२५-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT