kl rahul has been fined 20 percent his match fee  sakal
IPL

IPL 2022: KL राहुलला दुहेरी झटका, RCB कडून पराभूत झाल्यानंतर खिशाला कात्री

राहुलला सामन्यादरम्यान आयपीएल नियमांच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सला (LSG) आतापर्यंत तिसरा पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) 18 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर संघाला दुहेरी झटका बसला आहे. केएल राहुलला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला, तर मार्कस स्टॉइनिसलाही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. (KL Rahul Has Been Fined 20 Percent His Match Fee)

राहुलला सामन्यादरम्यान आयपीएल नियमांच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याने आपली चूक मान्य केली आहे. अशा परिस्थितीत राहुलला मॅचचा २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनौ संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आयपीएल नियमांच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यानेही आपली चूक मान्य केली आहे. अशा स्थितीत स्टॉइनिसला दंड ठोठावण्यात आला नसला तरी त्याला फटकारले आहे हे नक्की आहे. 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टॉइनिसला जोश हेझलवूडने क्लीन बोल्ड केले. मग बाद झाल्यावर स्टॉइनिसचा राग सातव्या गगनाला भिडला होता. रागाच्या भरात स्टॉइनिसने पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना बॅट जोरात हवेत फिरवण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान आरसीबीचा एक खेळाडू पुठे आला.

स्टॉइनिसने बॅट फिरवली असती तर त्या खेळाडूला दुखापत झाली असते. आऊट होण्याआधी ओव्हरचा पहिला बॉल ऑफ साइडमध्ये बराच बाहेर जात होता. अंपायरने त्याला वाइड दिले नाही. यामुळे स्टॉइनिसही संतापले आणि त्यांनी पंचांशी वाइडबाबत वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे स्टॉइनिसला फटकारले आहे.

सामन्यात बद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने 6 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावाच करू शकला आणि 18 धावांनी सामना गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT