Cricket Fans Viral Video | CSK vs KKR | IPL 2024 
IPL

CSK vs KKR: चेपॉक पिवळंच दिसलं पाहिजे सीएसकेचीच दादागिरी! केकेआरच्या चाहत्याचा Video व्हायरल

IPL 2024 Video: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यावेळी कोलकाता नाईट राडर्सच्या चाहत्यांना पोस्टर स्टेडियममध्ये नेण्यापासून रोखण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

IPL 2024, CSK vs KKR: सोमवारी चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा या स्पर्धेतील पाच सामन्यांतील तिसरा विजय होता.

दरम्यान, असे असले तरी एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियवर झालेल्या या सामन्यादरम्यानचा सध्या एक वाद समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोलकाता संघाच्या चाहत्यांना चेपॉक स्टेडियमवर पोस्टर्स नेण्यापासून रोखले जात असल्याचे दिसत आहे.

चाहत्यांनी केलेल्या दाव्यानुसार कोलकाता संघाला पाठिंबा देण्यासाठी आणलेल्या पोस्टर्सला चेपॉक स्टेडियममध्ये नेण्याची परवानगी स्टेडियम कर्मचाऱ्यांनी दिली नाही. त्यामुळे स्टेडियमबाहेर चाहत्यांकडून आक्रोशही करण्यात आला.

याबाबत काही युजर्सकडून सोशल मीडियावरही आवाज उठवण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.

अशाच एका व्हिडिओवर एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे की 'चेपॉक म्हणूनच संपूर्ण पिवळं दिसतं. हे असं होत आहे.' याचप्रकारच्याही प्रतिक्रिया अन्य काही युजर्सकडूनही करण्यात आल्या आहेत.

याशिवाय काही युजर्सने यामागील नियम समजावण्याचा प्रयत्नही केला आहे. एका युजरने कमेंट केली आहे की 'सीएए आणि एनआरसीच्या नियमानुसार पोस्टर्स आणि बॅनर्स आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये नेण्याची परवानगी नाही. गेल्यावर्षीही ईडन गार्डनवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चेन्नईचे पोस्टर मैदानात नेऊ दिले नव्हते.'

दरम्यान, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची पुष्टी सकाळ करत नाही.

सामन्यात चेन्नईचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याच्याव्यतिक्त केवळ सुनील नारायण (27) आणि अंगक्रिश रघुवंशी (24) यांनाच 15 धावांचा टप्पा पार करता आला.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमानने 2 विकेट्स आणि महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.1 षटकात 3 विकेट्स गमावत 141 धावा करून पूर्ण केला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 चेंडूत 67 धावांनी नाबाद खेळी केली.

तसेच शिवम दुबेने 28 धावांची आणि डॅरिल मिचेलने 25 धावांची खेळी केली. कोलकाताकडून गोलंदाजीत वैभव अरोराने 2 विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायणने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT