Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals esakal
IPL

KKR vs RR : यशस्वीचा केकेआरला विक्रमी तडाखा, राजस्थानने सामना 9 विकेट्स राखून जिंकला

अनिरुद्ध संकपाळ

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : कोलकाता नाईट रायडर्सचे 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 13 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर यशस्वी जैसवाल फक्त 13 चेंडूत 50 धावा ठोकून शांत बसला नाही. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची तडाखेबाज भागीदारी रचली. यशस्वी जैसवालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा चोपल्या. त्याला संजू सॅमसनने नाबाद 48 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी सामना 9 विकेट्स आणि तब्बल 41 चेंडू राखून जिंकला.

युझीचाच जलवा

युझवेंद्र चहलने आपल्या तिसऱ्या षटकात व्यंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची शिकार केली होती. त्याने चौथ्या षटकात रिंकू सिंहची (16) शिकार करत केकेआरला अजून एक मोठा धक्का दिला. यानंतर संदीप शर्माने शेवटच्या षटकात फक्त 7 धावा देत केकेआरला 20 षटकात 8 बाद 149 धावात रोखले.

अय्यरचे अर्धशतक मात्र... 

दरम्यान, व्यंकटेश अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 42 चेंडूत 57 धावा करणाऱ्या अय्यरचा चहलनेच काटा काढला. अय्यर बाद झाला त्यावेळी केकेआरच्या 16 षटकात 5 बाद 127 धावा झाल्या होत्या. अय्यर पाठोपाठ चहलने शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद करत केकेआरला सहावा धक्का दिला.

77-3 : नितीश राणा - अय्यरने डाव सावरला

पॉवर प्लेमधील संथ सुरूवातीनंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. अय्यरनेही आपपला गिअर बदलला होता. मात्र ही जोडी युझवेंद्र चहलने फोडली. त्याने राणाला 22 धावांवर बाद केले. यानंतर आक्रमक झालेल्या अय्यर आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरला 13 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर केएस आसिफने रसेलला 10 धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

37-2 (6 Ov) : केकेआरला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के

आपल्या होम ग्राऊंडवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थानचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. बोल्टने सलामीवीर जेसन रॉयला 10 धावांवर तर रहमनुल्ला गुरबाजला 18 धावांवर बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर केकेआरला पॉवर प्लेमध्ये 37 धावांपर्यंतच मजल मारता आली. व्यंकटेश अय्यरने तर 12 चेंडूत फक्त 2 धावाच केल्या.

राजस्थानने नाणेफेक जिंकली. 

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Order : बांगलादेशी महिलांना परत पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश; सात महिलांचा समावेश; बुधवार पेठेमध्ये करत देहविक्रीचा व्यवसाय!

IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक

Cosmetic Gynecology: कामा रुग्णालयात लवकरच ‘कॉस्मेटिक गायनेकोलॉजी’; देशात सरकारी रुग्णालयात प्रथमच विभाग सुरु होणार

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT