Laal Singh Chaddha Promotion Aamir Khan Take A Dig On Irfan Pathan
Laal Singh Chaddha Promotion Aamir Khan Take A Dig On Irfan Pathan esakal
IPL

Video : तुझ्या स्विंगपेक्षा दुखापतीच जास्त का? आमिरने इरफानची खेचली

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएलचा हंगाम आता शेवटच्या टप्यात आहे. सध्या प्ले ऑफमधील दोन सामने झाले असून आयपीएलचा फिव्हर टिपेला पोहचला आहे. हाच फिव्हर कॅच करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी आयपीएलच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवत आहेत. बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) देखील त्याचा आगामी चित्रपट लालसिंग चढ्ढाच्या (Laal Singh Chaddha प्रमोशनसाठी आयपीएलचा सहारा घेतला आहे.

सध्या आमिर खानच्या आमिरखान प्रॉडक्शन या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक रील शेअर करण्यात आला आहे. या रीलमध्ये खुद्द आमिर खानच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणची (Irfan Pathan) बाईट घेताना दिसतोय. मात्र आमिर खानने पहिल्यांदा इरफानची स्तुती केली आणि नंतर त्याच्यावर असा काही बाऊंसर टाकला की रागाने लाल झालेल्या इरफानने तेथून काढता पाय घेतला. या रीलमध्ये आमिर खान 'आपल्या सोबत आता इरफान पठाण आहे. तुला माहिती आहे की तू किती चांगला क्रिकेटर आहेस. मला माहिती आहे की तू किती चांगला क्रिकेटर आहेस. संपूर्ण जगाला माहिती आहे की तू किती चांगला क्रिकेटर आहेस. मात्र आमच्या तोंडात एकच प्रश्न आहे की तुझ्या स्विंगपेक्षा तुला दुखापतीच जास्त का झाल्या?' असे म्हणतो आणि इरफान तेथून चेहरा पाडून बाहेर पडतो.

मात्र हा व्हिडिओ शेअर करून त्याला आता रिव्हर्स स्विंगसाठी वाट पाहतोय असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आमिर खान - इरफान पठाण यांच्यातील खेचाखेचीचा पुढचा अंक नक्की येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आमिर खान आपल्या लाल सिंग चढ्ढाचे ट्रेलर 29 मे च्या आयपीएल फायनलमध्ये प्रदर्शित करणार आहे. हा ट्रेलर सामन्याच्या पहिल्या डावातील दुसऱ्या टाईम आऊटमध्ये प्रदर्शित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT