Mayank Yadav Injured sakal
IPL

IPL 2024 : लखनौला मोठा धक्का! 'स्पीड गन' Mayank Yadav जखमी, एका ओव्हरनंतर अचानक...

Mayank Yadav Injured : लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा तुफानी गोलंदाज मयंक यादव जखमी झाला आहे.

Kiran Mahanavar

Mayank Yadav Injured : लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा तुफानी गोलंदाज मयंक यादव जखमी झाला आहे. आणि त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध पहिली ओव्हर टाकल्यानंतर मैदान सोडले. त्यानंतर तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला नाही.

पहिल्या षटकात त्याने 13 धावा दिल्या. कर्णधार केएल राहुलने डावातील चौथे षटक त्याला दिले होते. तो त्यावेळी 140 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना दिसला. आणि पूर्णपणे लयीत तो दिसत नव्हता. पहिले षटक संपल्यानंतर मयंक फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला.

मयंक यादव दुखापतीमुळे आधी रणजी ट्रॉफीच्या या मोसमात दिल्लीतून बाहेर पडला होता. मयंक त्याच्या करिअरमध्ये घोट्याच्या दुखापतीने आणि हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने हैराण आहे. पंजाब किंग्जविरुद्ध खेळून त्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या वेगामुळे तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला.

त्याने दुसऱ्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात 14 धावांत 3 विकेट घेतल्या. आरसीबीविरुद्ध त्याने ताशी 156.7 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. जो आयपीएल 2024 चा सर्वात वेगवान चेंडू ठरला.

मयंक यादवने पंजाब किंग्जविरुद्ध 155.8 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्याने 2 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. मयंकने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर सलग दोन सामन्यात प्लेअर ऑफ द अवॉर्ड जिंकण्यात यश मिळविले. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादा वेगवान गोलंदाज त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीर ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT