IPL 2024 Tickets Controversy esakal
IPL

IPL 2024 Tickets Controversy : SRH vs CSK सामन्याचं तिकीट काढलं 4500 रूपयांच, सीट मात्र गायब... हा काय घोटाळा आहे?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Tickets Controversy : सनराईजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात एक मोठा घोटाळा झालाय. एका व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की त्याने या सामन्याचे तब्बल 4500 रूपयांचे तिकीट काढले होते.

मात्र त्याची सीटच गायब होती. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. जुनैद अहमद असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ज्यावेळी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेला त्यावेळी त्याच्या तिकीटावरच्या नंबरची सीट स्टेडियममध्ये अस्तित्वातच नसल्याचं दिसलं.

जुनैदने ट्विट केलं की, 'खूप निराशा झाली. मी चेन्नई-हैदराबाद सामन्याचं तिकीट काढलं होतं. त्या तिकीटावर J66 असा सीट नंबर होता. या क्रमांकाची सीटच मैदानात उपलब्ध नाही. मला सामना उभा राहून पाहावा लागला. आता मला माझे पैसे परत मिळणार का किंवा नुकसान भरपाई मिळणार का?'

जुनैदने या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात J66 क्रमांकाची कोणती सीट उपलब्धच नव्हती. त्याला आशा होती की J65 नंतर J66 क्रमांकाची सीट असेल. मात्र त्यानंतर थेट J77 क्रमांकाची सीट होती.

त्यानंतर जुनैदने अजून एक ट्विट केलं. त्यात त्याने माझी हरवलेली सीट इनिंग ब्रेकमध्ये मिळाली. ही सीट J69 - 70 च्या मधे सापडली. कोणीतरी हा गोंधळ घातला आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT