Marcus Stoinis Angry Reaction Video Viral sakal
IPL

IPL 2022: स्टोइनिस क्लीन बोल्ड झाल्यामुळे संतापला, थेट घातल्या शिव्या... Video Viral

बाद झाल्यानंतर स्टॉइनिसचा राग सातव्या गगनाला भिडला व्हिडीओ व्हायरल

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग हंगामामध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना खेळला गेला. बंगळुरू संघाने यामध्ये 18 धावांनी शानदार विजय नोंदवला. सामन्यातील आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस विजयाचा हिरो ठरला. पण लखनौचा मार्कस स्टॉइनिसही सोशल मीडियावर चर्चेत आला. सामन्यात 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला लखनौ संघाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. जोश हेझलवूडने त्याची शिकार केली. बाद झाल्यानंतर स्टॉइनिसचा राग सातव्या गगनाला भिडला त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(Marcus Stoinis Video Viral)

स्टॉइनिसने रागाच्या भरात पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना बॅट हवेत फिरवले आणि शिव्या दिल्या. आऊट होण्याआधी, म्हणजे ओव्हरचा पहिला चेंडू ऑफ साइडमध्ये बराच बाहेर टाकला होता. स्टॉइनिस हा खेळू शकला नाही. फील्ड अंपायरने त्याला वाइड म्हटले नाही. यामुळे स्टॉइनिस संतापला आणि त्यांनी पंचांशी वाइडबाबत वाद घालण्यास सुरुवात केली.

स्टॉइनिसने षटकाच्या पहिल्या चेंडूवर वाईडबाबत वाद घालणे आणि दुसऱ्या चेंडूवर आऊट झाल्यानंतर राग येणे, या दोन्ही गोष्टींसाठी त्याच्यावर कारवाईही होऊ शकते. मात्र आतापर्यंत अशी कोणतीही बातमी आले नाही. स्टॉइनिसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते त्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. स्टॉइनिस बाद झाला तेव्हा लखनौ संघाला विजयासाठी 10 चेंडूत 34 धावा हव्या होत्या आणि 3 विकेट शिल्लक होत्या.

सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाने 6 गडी बाद 181 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने 64 चेंडूत 96 धावा केल्या. शाहबाज अहमदने 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 23 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावाच करू शकला आणि त्याचा 18 धावांनी पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT