Mayank Agarwal Will be Punjab Kings New Captain  esakal
IPL

पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची माळ गब्बरच्या गळ्यात नाही?

सकाळ डिजिटल टीम

पंजाब किंग्जला (Punjab Kings) केएल राहुलने टाटा बाय बाय केल्यानंतर पंजाबने आपले फक्त दोन खेळाडूच रिटेन केले होते. मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग या दोघांनाच पंजाबने रिटेन केले. त्यानंतर लिलावात (IPL 2022 Auction) गब्बर अर्थात शिखर धवनला (Shikhar Dhawan) 8.25 कोटी खर्चून आपल्या गोटात खेचले. याचवेळी पंजाब किंग्जचा कर्णधार (Punjab Kings Captain) शिखर धवन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंजाब किंग्जने आपला रिटेन केलेला खेळाडू मयांक अग्रवाललाच कर्णदारपद देणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.

सूत्रांनी सांगितले की, 'सर्व शक्यता पडताळून पाहिल्यानंतर मयांक अग्रवालला पंजाब किंग्जचा कर्णधार करण्याचे ठरले आहे. (Mayank Agarwal Punjab Kings Captain) या आठवड्यात याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.' पंजाबने यंदाच्या लिलावात रिटेंशनमध्ये जास्त पैसा न खर्च करता तो मेगा लिलावासाठी राखून ठेवला होता. त्याचा फायदा त्यांना शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लिम लिव्हिंगस्टोन, कसिगो रबाडा, शाहरूख खान यासरखे तडगे खेळाडू खरेदी करण्यात झाला.

दरम्यान, लिलावानंतर शिखर धवन पंजाबचा (PBKS) कर्णधार होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र व्यवस्थापन मयांक अग्रवालला कर्णधार करण्यासाठी जास्त उत्सुक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'धवन संघात येणे ही चांगली बाब आहे लिलावात त्याला आपल्या गोटात घ्यायचं हे ठरलं होतं. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे मात्र पंजाब केएल राहुल नंतर मयांक अग्रवालला कर्णधार करण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.'

मयांक अग्रवालने केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता त्यावेळी संघाचे नेतृत्व केले होते. गेल्या दोन हंगामात अग्रवालने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 2011 ला आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने जवळपास 100 सामने खेळले आहेत. 31 वर्षाच्या या सलामीवीराने भारताकडून 19 कसोटी आणि 5 वनडे सामने देखील खेळले आहेत. पंजाबला आयपीएल विजेतेपदाचा आपला दुष्काळ संपवायचा आहे. ते 2014 ला फायनलमध्ये पोहचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT