IPL 2024 RCB vs LSG  sakal
IPL

IPL 2024 RCB vs LSG : तेजतर्रार मयंकची वेगवान गोलंदाजीत ‘यादवी’ ; बंगळूरच्या फलंदाजांना दणका,लखनौचा शानदार विजय

डी कॉक याची धडाकेबाज ८१ धावांची खेळी... निकोलस पूरनच्या आक्रमक नाबाद ४० धावा... अन्‌ युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव (३/१४) याचा आणखी एक भन्नाट स्पेल याच जोरावर लखनौ संघाने आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत बंगळूर संघावर २८ धावांनी मात केली.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : डी कॉक याची धडाकेबाज ८१ धावांची खेळी... निकोलस पूरनच्या आक्रमक नाबाद ४० धावा... अन्‌ युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव (३/१४) याचा आणखी एक भन्नाट स्पेल याच जोरावर लखनौ संघाने आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत बंगळूर संघावर २८ धावांनी मात केली. लखनौचा हा दुसरा विजय ठरला. यजमान बंगळूर संघाला मात्र घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. हा त्यांचा मोसमातील तिसरा पराभव ठरला.

लखनौकडून बंगळूरसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मयंक यादवसह इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्प्यातील गोलंदाजीसमोर बंगळूरच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. विराट कोहली व फाफ ड्युप्लेसी या जोडीने ४० धावांची भागीदारी करताना सुरुवात छान केली; पण सिद्धार्थच्या गोलंदाजीवर विराट २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्युप्लेसी १९ धावांवर धावचीत झाला. मयंक यादवच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे बंगळूरचे फलंदाज अपयशी ठरले. लोमरोर याने ३३ धावांची खेळी केली. त्याला काही यश मिळाले नाही.

बंगळूरचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, याआधी बंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटॉन डी कॉक व के. एल. राहुल या जोडीने आक्रमक सुरुवात करताना ५२ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर राहुल मयंक डागरकरवी २० धावांवर झेलबाद झाला. डी कॉकने मात्र आपला झंझावाती खेळ कायम ठेवला. त्याने ५६ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी साकारताना ८ चौकार व ५ षटकारांचा पाऊस पाडला. निकोलस पूरनने अवघ्या २१ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावांची फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक ः लखनौ २० षटकांत ५ बाद १८१ धावा (क्विंटॉन डी कॉक ८१, निकोलस पूरन नाबाद ४०, ग्लेन मॅक्सवेल २/२३) विजयी वि. बंगळूर सर्व बाद १५३ धावा (विराट कोहली २२, रजत पाटीदार २९, महिपाल लोमरोर ३३, मयंक यादव ३/१४, नवीन हक २/२५).

मयंकचा प्रभावी मारा

पंजाबविरुद्धच्या लढतीत २७ धावा देत तीन फलंदाज बाद करीत सामन्याला कलाटणी देणारा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव बंगळूरविरुद्धच्या लढतीतही चमकला. त्याने १४ धावांत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एवढेच नव्हे, तर मयंक सातत्याने १५० किलोमीटर ताशी वेगाने चेंडू टाकत होता, हे विशेष. आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने मॅक्सवेलला (०) पूरनकरवी झेलबाद केले. यानंतर नऊ धावांवर खेळत असलेल्या कॅमेरुन ग्रीनचा त्रिफळा उडवला. या चेंडूच्या वेगापुढे ग्रीन निष्प्रभ ठरला. पुन्हा आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने रजत पाटीदार याला २९ धावांवर बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

Louvre Museum Robbery : मोनालिसाची पेंटींग असलेल्या म्युझियममध्ये दरोडा, अवघ्या सात मिनिटांत लंपास केले ऐतिहासिक दागिने, कशी झाली चोरी?

No Kings Protest: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निषेधाची आग! नो किंग्ज आंदोलन म्हणजे नेमकं काय? लाखो लोक रस्त्यावर का उतरलेत?

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

SCROLL FOR NEXT