Mohammed Shami Kane Williamson  ESAKAL
IPL

IPL 2022 : मोहम्मद शमी म्हणजे विल्यमसनचा कर्दनकाळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 40 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रथम गोलंदाजी करत पॉवर प्लेमध्येच सनाईजर्स हैदराबादला दोन धक्के दिले. मोहम्मद शामीने (Mohammed Shami) दमदार गोलंदाजी करत हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला (Ken Williamson) 5 तर आक्रमक राहुल त्रिपाठीला 16 धावांवर बाद केले. विशेष म्हणजे केन विल्यमसनसाठी पुन्हा एकदा मोहम्मद शामी कर्दनकाळ ठरला आहे. शामीच्या या स्पेलमध्ये दोन विकेट घेत हैदराबादची पॉवर प्लेमध्येच अवस्था 2 बाद 44 धावा अशी केली.

विशेष म्हणजे मोहम्म शामीने केन विल्यमसनला टी 20 क्रिकेटमध्ये (T 20 Cricket) तब्बल पाचव्यांदा बाद केले आहे. या दोघांच्या रायव्हलरीमध्ये मोहम्मद शामीचे पारडे जड आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत विल्यमसनला 53 चेंडू टाकले आहेत. त्यात विल्यमसनला फक्त 70 धावा करण्यात यश आले आहे. तर मोहम्मद शामीने केन विल्यमसनला तब्बल 5 वेळा बाद केले आहे. केन विल्यमसनचे मोहम्मद शामीविरूद्ध स्ट्राईक रेट 132.07 इतके आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात हैदराबादचे 44 धावांवर 2 विकेट गेल्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि एडिन माक्ररमने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 भागीदारी रचली. त्यामुळे हैदराबादने 15 व्या षटकात 140 धावांचा टप्पा पार केला होता. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 65 धावांची खेळी केली. मात्र त्याला जोसेफने बाद करत ही जोडी फोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT