Tushar Deshpande IPL 2023 Final
Tushar Deshpande IPL 2023 Final esakal
IPL

Tushar Deshpande : तुषार देशपांडे नाही तर 'या' स्टार खेळाडूने दिल्यात आयपीएल फायनलमध्ये खंडीभर धावा

अनिरुद्ध संकपाळ

Tushar Deshpande IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 215 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. साई सुदर्शनने 96 धावांची तुफानी खेळी केली. तर चेन्नईकडून तुषार देशपांडेने 4 षटकात 56 धावा दिल्या.

त्यामुळे चेन्नईच्या फॅन्ससाठी तुषार देशपांडे हा आजच्या सामन्याचा व्हिलन ठरला. मात्र तुषार देशपांडे एकटाच नाहीये ज्याने आयपीएल फायनलमध्ये 50 पेक्षा जास्त धावा दिलेल्या नाहीत. भल्या भल्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गोलंदाजांची आयपीएल फायनलमध्ये धुलाई झाली आहे.

आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वात वरचे स्थान हे शेन वॉट्सनचे आहे. शेन वॉट्सन 2016 च्या हंगामात आरसीबीकडून खेळत होता. त्यावेळी हैदराबादविरूद्ध बंगळुरू येथे झालेल्या फायनल सामन्यात त्याने 61 धावा दिल्या होत्या.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केकेआरचा लोकी फर्ग्युसनचे नाव येते. त्याने 2021 च्या आयपीएल फायनल सामन्यात चेन्नईविरूद्ध 56 धावा दिल्या होत्या. आज चेन्नईच्या तुषार देशपांडेने गुजरात विरूद्ध 56 धावांची लयलूट केली. पंजाबच्या करणवीर सिंहने केकेआरविरूद्ध 2014 च्या हंगामात 54 धावा दिल्या होत्या.

आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावांची धडाकेबाज खेळी केली. सुदर्शन सोबतच वृद्धीमान साहाने देखील 54 धावांचे योगदान दिले. त्याने 204.26 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. हार्दिकने 12 चेंडूत 21 तर गिलने 20 चेंडूत 39 धावा ठोकल्या. चेन्नईकडून पथिरानाने 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT