MS Dhoni RCB vs CSK IPL 2024 sakal
IPL

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

संघाच्या या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजी क्रमावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की इतक्या महत्त्वाच्या सामन्यातही तो खालच्या स्थानावर फलंदाजीला का आला?

Kiran Mahanavar

MS Dhoni RCB vs CSK IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2024 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह सीएसकेही स्पर्धेतून बाहेर गेली आहे. त्यांना प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले नाही.

संघाच्या या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजी क्रमावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की इतक्या महत्त्वाच्या सामन्यातही तो खालच्या स्थानावर फलंदाजीला का आला? जर धोनी फलंदाजीच्या क्रमवारीत वर आला असता तर कदाचित सामन्याची स्थिती वेगळी असती.

या सामन्यात एमएस धोनी पुन्हा एकदा खूप कमी फलंदाजीला आला. त्याच्या आधी मिचेल सँटनरलाही पाठवण्यात आले, ज्याने 4 चेंडूत केवळ 3 धावा केल्या. नंतर धोनी आला आणि त्याने 13 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली. शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 110 मीटर लांब षटकारही मारला.

अशा परिस्थितीत एमएस धोनी थोडा वर फलंदाजीला आला असता तर सामन्याची स्थिती वेगळी असू शकली असती. मिचेल सँटनरमुळे वाया जाणारा वेळ वाचला असता. आणि धोनी अजून जास्त चेंडू खेळून संघाला सामना जिंकून देऊ शकला असता.

कारण सीएसकेला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 201 धावांची गरज होती आणि त्यांना फक्त 191 धावा करता आल्या. संघ केवळ 10 धावांनी बाहेर गेला. जर एमएस धोनीने आधी येऊन मिचेल सँटनरने खेळलेले तेच 4 चेंडू खेळला असता तर परिस्थिती वेगळी असू शकली असती.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट गमावून 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्ज संघ 7 विकेट गमावून 191 धावाच करू शकला. 22 चेंडूत 42 धावा केल्यानंतर रवींद्र जडेजा नाबाद राहिला पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT