ms dhoni-chennai-super-kings-saved-career-of-former-india-captain-ajinkya-rahane-ipl-2023 cricket news in marathi  
IPL

IPL 2023: बुडत्याला काडीचा आधार... MS धोनीने वाचवली 'कर्णधारा'ची कारकीर्द!

सीएसकेमध्ये सामील होणे अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीसाठी देखील वरदान...

Kiran Mahanavar

IPL 2023 Ajinkya Rahane : आयपीएल 2023च्या 12व्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेसमोर 20 षटकांत 158 धावांचे लक्ष्य होते, जे चेन्नई सुपर किंग्जने 11 चेंडू राखून पूर्ण केले.

सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला 34 वर्षीय अजिंक्य रहाणे. रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान रहाणेने सीझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक आणि आयपीएलमधील सीएसकेसाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. रहाणेने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

आयपीएल 2023 मध्ये खेळलेली ही खेळी अजिंक्य रहाणेसाठी खूप महत्त्वाची आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीतही त्याला स्थान मिळाले नाही.

म्हणजेच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द बुडताना दिसत होती. कारण रहाणेवर आधीच कसोटीपटू म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. याच कारणामुळे तो बऱ्याच दिवसांपासून एकदिवसीय आणि टी-20 संघातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत ही एक खेळी त्याच्यासाठी संजीवनी ठरली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

रहाणेच्या खेळीत महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेचाही मोठा हात आहे. सीएसकेने नेहमीच बुडत्याला काडीचा आधार असल्याचे सिद्ध केले आहे. रॉबिन उथप्पाला 2021 मध्ये संधी देण्यात आली होती आणि आता अजिंक्य रहाणे आणि दोन्ही खेळाडूंनी संघाने दाखविलेल्या विश्वासावर जगले आणि चांगली कामगिरी केली.

सीएसकेमध्ये सामील होणे अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीसाठी देखील वरदान ठरले आहे. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या कर्णधारावर कोणताही फ्रेंचायझी संघ बोली लावायला तयार नव्हता.

धोनीच्या सीएसकेने रहाणेला 50 लाख रुपयांना विकत घेतले, मात्र बलाढ्य खेळाडूंच्या फौजेत धोनी रहाणेला संधी देईल, अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. पण, धोनीने अनुभवी कर्णधाराला संधी दिली आणि रहाणेनेही या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. झंझावाती अर्धशतक ठोकून हे दाखवून दिले की त्याच्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे आणि तो टीम इंडियात परतण्यास तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT