MS Dhoni Clear Air Over Is he going to play in next IPL Season For CSK esakal
IPL

धोनीने शेवटच्या सामन्यात पुढच्या हंगामाबाबत दिले 'महत्वाचे' संकेत

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आज आयपीएलच्या 15 व्या हंगामातील आपला शेवटचा सामना खेळत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनी पुढच्या हंगामात दिसणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. आजच्या सामन्यात धोनी नाणेफेक करण्यासाठी आला त्यावेळी त्याने आपण पुढच्या हंगामात पिवळ्या जर्सीत दिसणार की नाही याचा खुलासा केला. त्याने मागे एकदा केलेल्या वक्तव्याचाच पुनरूच्चार केला.

महेंद्रसिंह धोनी नाणेफेक करण्यासाठी आला. त्याने नाणेफेक जिंकली आणि आजच्या सामन्यात काय बदल असतील हे सांगितले. त्यानंतर इयान बिशप यांनी धोनीला मिलियन डॉलर प्रश्न विचारला. धोनी पुढच्या हंगामात दिसणार का? यावर धोनी म्हणाला की नक्कीच मी 2023 ची आयपीएल खेळणार. याचं कराण म्हणजे जर मी चेन्नईत खेळलो नाही आणि आयपीएलला बाय बाय केलं तर ते चाहत्यांच्या बाबतीत योग्य ठरणार नाही. मुंबईत देखील मला आणि संघाला देखील खूप प्रेम मिळालं आहे. मात्र चेन्नईच्या फॅन्सना मी चेन्नईत न खेळणं चांगल वाटणार नाही.'

चेन्नई यापूर्वीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. मात्र राजस्थानला प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 13 सामन्यात 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. ते चांगल्या रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. जर त्यांनी आजचा सामना जिंकला तर ते 18 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. जर चेन्नईने आज राजस्थानचा पराभव केला आणि दिल्लीने मुंबईला पराभूत केले तर गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचा फैसला रनरेटवर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT