MS Dhoni  esakal
IPL

MS Dhoni CSK : चेन्नईचा नेतृत्व बदल अन् मुंबईला धडा... ना वाद ना चर्चा थेट कंडकाच पाडला

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Hand Over CSK Captaincy To Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाच्या हंगामात फिट आहे की नाही तो गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला आहे का असे अनेक प्रश्न आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी चर्चेत होते. मात्र धोनी हंगामाच्या सुरूवातीलाच कॅप्टन्सी सोडेल असं कोणाच्याही ध्यानी मनी नव्हते. मात्र चेन्नईने कोणतीही अधिकृत घोषणा न करत आयपीएलच्या फोटो सेशनवेळीच धोनी आता चेन्नईचा कर्णधार असणार नाही हे अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं.

धोनीने असे अप्रत्यक्षरित्या निर्णय घेणे हे काही नवीन नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती देखील अशाच प्रकारे एक ट्विट घेत केली होती. मात्र त्याने चाहत्यांना आयपीएलमध्ये मैदानावरून निवृत्ती घेण्याचे वचन दिले आहे.

कॅप्टन्सीबाबबत मात्र धोनीने आपले जुने धक्कातंत्र वापरत सर्वांना जोर का झटका धिरेसे दिला. ऋतुराज धोनीच्या अन् त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. मात्र मुंबई इंडियन्स चेन्नईकडून कशा प्रकारे आपली गुपितं ही गुपितं ठेवायचे हे शिकावं लागेल. चेन्नईने नेतृत्वबदलाबाबत निर्णय झाला आहे याची कोणालाच कुणकुण लागू दिली नाही.

मुंबई इंडियन्सने देखील याच हंगामापूर्वी आपला कर्णधार बदलला. मात्र हे ट्रान्झिशन सहज झाले नाही. आधी पांड्या मुंबईत ट्रेडद्वारे परतला हेच कोणाला पचत नव्हते. त्यानंतर पांड्याने आल्या आल्या रोहितच्या कॅप्टन्सीवर घाला घातला. त्याने करार करतानाच कॅप्टन्सीची अट घातील असल्याची चर्चा सुरू आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील संबंध यामुळे ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत हंगामात संघात एकोपा ठेवणे जिकीरीचे जाणार आहे. चेन्नईतही सर्व काही आलबेल राहील असं नाही. मात्र आजी - माजी कर्णधारामधील नातं तरी चांगलं असणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: निवृत्तीच्या आधी न्यायाधीशांनी नेमकं काय केलं? CJI सूर्यकांत यांनी व्यक्त केली चिंता, न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात ऐतिहासिक उसळी, चांदीनेही मोडला विक्रम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Ashes Test: नॅथन लायनमुळे चिडला Glenn McGrath; हात वर केले, फेकायला खूर्ची उचलली अन्... Video Viral

Code of Conduct : आचारसंहितेबाबत आयुक्तांचा इशारा; उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

SCROLL FOR NEXT