MS Dhoni Last IPL season
MS Dhoni Last IPL season esakal
IPL

MS Dhoni | धोनी 'दुसरा' धक्का देणार की...

अनिरुद्ध संकपाळ

सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 ला एक ट्विट केले होते. हे ट्विट साधे सुधे नव्हते. ते ट्विट होते धोनीच्या निवृत्तीचे. भारताचा सर्वात यशस्वी म्हणून गणला जाणारा कर्णधाराने एका ओळीत आपला निवृत्तीनामा प्रसिद्ध केला होता. आता अशाच एका ट्विटने पुन्हा एकदा एमएस धोनीच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. अर्थात हे ट्विट धोनीने केले नाही तर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने केले.

24 मार्च 2022 ला चेन्नई सुपर किंग्जने ट्विट करून सांगितले की आता धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार नाही तर रविंद्र जडेजा हा सीएसकेचा नवा थलायवा (MS Dhoni Handed Over CSK Captaincy To Ravindra Jadeja) असणार आहे. चेन्नईच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल 2022 हा शेवटचा हंगाम ठरणार का? आता थलायवा पुन्हा पिवळ्या जर्सीत दिसणार नाही का? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत.

विशेष म्हणजे महेंद्रसिंह धोनी कायम धक्कातंत्राचा वापर करत आपले महत्वपूर्ण निर्णय घोषित करत असतो. धोनी टायमिंगच्या बाबतीत किंग आहे. हे धोनीचे टायमिंग साधणे चाहत्यांसाठी मात्र कायमच वेदनादायी ठरले आहे. मात्र यावेळी धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडण्याचा धोनीच्या निर्णयाचे संकेत रिटेन्शन पॉलिसीवेळीचे मिळाले होते. ज्यावेळी चेन्नईने आपली रिटेन्शन पॉलिसी जाहीर केली त्यावेळी धोनीपेक्षा रविंद्र जडेजाला जास्त रक्कम देण्यात आली होती. म्हणजे चेन्नईने आपला पहिल्या पसंतीचा खेळाडू हा रविंद्र जडेजा म्हणून घोषित केला होता. असे करण्यासाठी धोनीनेच सांगितले होते अशा बातम्याही माध्यमात झळकल्या.

यावरूनच चेन्नई सुपर किंग्जमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आगोदरच धोनी कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा झाली. आता चर्चा सुरू झाली आहे ती धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल का याची. ज्या अर्थी धोनीने सीएसकेचे नेतृत्व सोडले त्या अर्थी तो आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण धोनीचा बॅटिंग फॉर्म पाहता तो फलंदाज म्हणून सीएसकेच्या संघात गेल्या हंगामातच बसत नव्हता.

तो संघाचा कर्णधार होता, विकेटमागील त्याची कामगिरी चांगली होती. मात्र गेल्या हंगामातच धोनी संघात खेळणारा एक 'मेंटॉर' झाला होता. त्याला फलंदाजीत उपयुक्तता सिद्ध करता येत नव्हती. तेव्हाच धोनीचे पिवळ्या जर्सीतील दिवस आता संपत आले असल्याचे संकेत मिळाले होते. आता त्याने आपला आयपीएलचा दौदिप्यमान प्रवास संपवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. धोनीने गेल्या हंगामातच आपण घरच्या मैदानावर म्हणजे चेन्नईत खेळणार असल्याचे संकेत दिले होते.

मात्र यंदाचा हंगाम हा मुंबई, पुणे आणि गुजरात या तीन व्हेन्यूवरच होणार असल्याने पुन्हा एकदा धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबत गुढ निर्माण झाले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना तो पुढच्या हंगामात चेन्नईत निवृत्ती घेईल अशी आशा आहे. मात्र धोनीचा पूर्व इतिहास पाहिला तर धोनी धक्कातंत्र अवलंबतो. त्यामुळे याच हंगामात धोनी दुसऱ्यांदा धक्का देणार की हा धक्का पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवणार हे येणार काळच ठरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT