Rachin Ravindra, MS Dhoni, Shivam Dube, Ravindra Jadeja Sakal
IPL

MS Dhoni Video: 'ऋतुराज माझ्यासारखाच...', रचिन रविंद्रला विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं उत्तर

MS Dhoni Video: 'आता नवा कर्णधार...', रचिन रविंद्रला सुटलेल्या कॅचबद्दल विचारलेल्या प्रश्नावर धोनीचं भन्नाट उत्तर

Pranali Kodre

MS Dhoni Viral Video: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी जसा त्याच्या शांत स्वभावासाठी आणि चपळाईसाठी ओळखला जातो. पण असे असले तरी अनेकदा संघसहकाऱ्यांबरोबर मस्ती करताना किंवा तो चटकन पण काहीशा विनोदाने उत्तर देतानाही दिसतो.

त्याची हीच बाजू नुकतीच एका कार्यक्रमावेळी दिसली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

सध्या आयपीएल 2024 स्पर्धा सुरू असून चेन्नई सुपर किंग्सने दोन सामने खेळले आहेत. यंदाच्या स्पर्धेपूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले असून ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे. याचीच आठवणही धोनीने करून दिलेली व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते.

चेन्नईचा आयपीएल 2024 मधील गुजरात टायटन्सविरुद्धचा दुसरा सामना झाल्यानंतर एका प्रमोशनल इव्हेंटसाठी धोनीसह रचिन रविंद्र, रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे गेले होते. यावेळी रचिनला त्याच्याकडून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात १५ व्या षटकात साई सुदर्शनचा झेल सुटल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

त्याला विचारण्यात आले होते की झेल सुटल्यानंतर त्याने एमएस धोनीकडे पाहिले का आणि धोनीची त्यावर प्रतिक्रिया काय होती?

यावर रचिन उत्तर देण्यापूर्वीच धोनी आधी म्हणाला, 'हा, पण यावेळी नवीन कर्णधार आहे.' त्यावर सर्वजण हसायला लागले.

त्यानंतर धोनी म्हणाला, 'मी असा व्यक्ती नाही जो खूप प्रतिक्रिया देतो. विशेषत: जेव्हा एखादा खेळाडू पहिला किंवा दुसरा सामना खेळत असतो. मला वाटते ऋतू देखील माझ्यासारखाच आहे. पण रचिनला 360 डिग्री मैदानात इकडून तिकडे पळताना पाहून मजा आली, असं वाटत होतं तो नाचत आहे.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रचिनने गुजरातविरुद्ध एक झेल सोडला असला, तरी त्याने त्याच सामन्यात तीन अफलातून झेल घेतले होते. इतकेच नाही, तर चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी करतानाही शानदार खेळ केला आहे.

त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूविरुद्धच्या सामन्यात 15 चेंडूत 37 धावा केल्या होत्या, तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 20 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. त्याला आयपीएल 2024 लिलावात चेन्नईने 1.8 कोटी रुपयांना खरेदी करत संघात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT