CSK vs RR Playing 11 Ajinkya Rahane esakal
IPL

CSK vs RR Playing 11 : दुसरा पर्यायच नाही! गेल्या सामन्यातील हिरोला धोनी बसवणार बेंचवर?

अनिरुद्ध संकपाळ

CSK vs RR Playing 11 Ajinkya Rahane : आयपीएलच्या एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईने मोईन अली आजारी असल्याने अजिंक्य रहाणेला संधी दिली होती. त्याने या संधीचे सोने करत 27 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठोकले होते. मात्र निकोलस पूरनने त्याचे हे रेकॉर्ड मोडले.

मात्र असे असले तरी आजच्या राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे सीएसकेच्या प्लेईंग 11 मध्ये असेलच याची कोणतीही शाश्वती नाही. धोनी आणि चेन्नईचे संघ व्यवस्थापन नाईलाजाने अजिंक्य रहाणेला बेंचवर बसवू शकतात. अजिंक्य रहाणेने गेल्या सामन्यात दमदार कामगिरी करून देखील चेन्नई त्याला का संधी देऊ शकत नाही. तो अनफिट आहे का? आजारी आहे का?

नाही अजिंक्य रहाणेला ना दुखापत झाली आहे ना तो आजारी आहे. एक म्हणजे राजस्थान विरूद्धच्या सामन्यात मोईन अली फिट झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी रहाणे मुंबई इंडियन्सविरूद्ध 225 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या असल्या तरी राजस्थानविरूद्धच्या चार गोलंदाजांविरूद्ध त्याचा स्ट्राईक रेट 100 च्या आसपासच राहिला आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरूद्ध त्याची सरासरी 97.22 आहे. तर संदीप शर्माविरूद्ध त्याची स्ट्राईक रेट 92.20 तर अश्विनविरूद्ध 116.66 इतकी आहे. चहलविरूद्धच अजिंक्य रहाणेने 107.69 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे या चार गोलंदाजांविरूद्ध 12 वेळा बाद झाला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT