MS Dhoni Retirement esakal
IPL

MS Dhoni Retirement : धोनीचे निवृत्तीबाबत घुमजाव! कॅप्टनची झाली अडचण, आता 2025 चा मेगा लिलाव...

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Retirement : आयपीएलचा 16 वा हंगाम हा महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा हंगाम आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच धोनीचे देशभरातील फॅन्स धोनी ज्या स्टेडियममध्ये जातोय त्या स्टेडियममध्ये जाऊन त्याचे सामने पाहत आहेत. धोनी फलंदाजीला यावा म्हणून आधीचे फलंदाज लवकर बाद व्हावे अशी प्रार्थना करत असतात. मात्र धोनी या हंगामात निवृत्ती घेणार नसल्याचे संकेत मिळत आहे.

महेंद्रसिंह धोनीने कधीही आपल्या आयपीएल निवृत्तीबाबत स्पष्ट संकेत दिले नव्हते. मात्र त्याच्या काही वक्तव्यांमधून आयपीएलचा 16 वा हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे निष्कर्ष काढले गेले. मात्र धोनीच्या जवळच्या व्यक्तींना दिलेल्या माहितीनुसार धोनी अजून एक वर्ष तरी आयपीएल खेळणार आहे. तो चेन्नई सुपर किंग्जचे अजून एक वर्ष नेतृत्व करेल. धोनी आपली निवृत्ती 2025 च्या आयपीएल मेगा लिलावादरम्यान घोषित करेल असा अंदाज आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा धोनीनंतर नेता कोण असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. चेन्नईला अजून धोनीचा वारसदार मिळालेला नाही. अशा परिस्थितीत धोनी अचानक आपल्या संघाला वाऱ्यावर सोडून जाऊ शकतो नाही. याबाबत चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली.

तो म्हणाला की, 'धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत आम्हाला काहीही सांगितलेले नाही. आम्हाला याची कल्पना आहे की आता नाही तर कधीतरी तो दिवस येणार आहे. मात्र त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीवर आहे. ज्यावेळी ते धोनीचा वारसदार निवडतील त्यावेळी तो निर्णय घेऊ शकतो. सध्या आमच्याकडे याबाबत फारसे पर्याय नाही. बेन स्टोक्स दुखापतीने बेजार आहे. जडेजाला संधी दिली होती. मात्र त्याला यश मिळाले नाही. याच कारणामुळे धोनी अजून थांबलाय. सध्याच्या घडीला तरी महेंद्रसिंह धोनीने 2023 च्या हंगामादरम्यान निवृत्ती घेण्याबाबात काही सांगितलेले नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT