MS Dhoni Retirement  
IPL

IPL 2023 : 'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा...' विजयानंतर धोनीच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

एमएस धोनी घेणार निवृत्ती?

Kiran Mahanavar

MS Dhoni Retirement : आयपीएलचा हा सीझन सुरू झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत अटकळ आणि प्रश्न वाढत आहेत. धोनीचा हा शेवटचा सीझन असेल का? अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. त्याचवेळी धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे चाहतेही याबाबत धास्तावले आहेत आणि त्यामुळे ते सर्वत्र मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी पोहोचत आहेत. आता खुद्द धोनीने एका वक्तव्याने या अटकळांना पुन्हा खतपाणी घातले आहे.

चेपॉक स्टेडियमवरील शुक्रवारची रात्र चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली गेली. अखेर संघाने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. रवींद्र जडेजाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि डेव्हॉन कॉनवेची दमदार खेळी याशिवाय एमएस धोनीचा झेल, स्टंपिंग आणि विकेटमागे धावचीत हेदेखील यामागे मोठे कारण होते.

सामना संपल्यानंतर धोनीने हर्षा भोगले यांच्याशी मजेदार संवादात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. यापैकी धोनीने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले. चेन्नईतील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाने खूश झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले की, दोन वर्षांनंतर येथील प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणे विशेष आहे.

धोनी पुढे म्हणाला, दुसरं काय सांगू. आता मी सर्व काही सांगितले आहे. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. येथे खेळणे छान आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे. फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही, पण तक्रार नाही. येथे मला प्रथम क्षेत्ररक्षण करताना संकोच वाटत होता, कारण मला वाटले की तेथे जास्त दव पडणार नाही. आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली.

रवींद्र जडेजाने चार षटकात केवळ 22 धावा देत तीन विकेट घेतल्या. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी 87 धावांची सलामी दिली. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. डेव्हॉन कॉनवेच्या 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्याने सीएसकेने आठ चेंडू बाकी असताना सामना जिंकला.

या विजयासह चेन्नई सहा सामन्यांत आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचेही सहा सामन्यांतून आठ गुण आहेत, पण चांगल्या धावगतीमुळे ते पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. सनरायझर्स सहा सामन्यांतून चार गुणांसह 10 संघांमध्ये नवव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

Dermatitis Spread: 'साेलापूर शहरात टिनिया, कॅन्डिडासह त्वचेच्या विकारांत होतेय वाढ'; शहरात अतिवृष्टी, घाण पाणी अन् ओलाव्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT