MS Dhoni CSK Play Offs esakal
IPL

MS Dhoni CSK Play Offs : अशी कोणतीही रेसिपी नाही... धोनीने सांगितले प्ले ऑफ गाठण्याचे रहस्य

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni CSK Play Offs : चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला अन् आयपीएलच्या 16 व्या हंगामात प्ले ऑफमध्ये थाटात प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्जने रेकॉर्ड ब्रेक 12 वेळा प्ले ऑफ गाठण्याची किमया केली आहे. याबाबत बोलताना चेन्नई सुपर किंग्जच्या थलायवाने सीएसकेच्या यशाचे गमक सांगितले.

सामन्यानंतर धोनीला 14 हंगामात 12 वेळा प्ले ऑफ गाठण्याची किमया साधण्याची रेसिपी काय असे विचारले. त्यावेळी त्याने रेसिपी अशी काही नाही तर यामागे संघ प्रथम हे तत्वज्ञान आहे. धोनीची ही शक्यतो शेवटची प्ले ऑफ आहे. धोनी बोलताना म्हणाला की, 'चेन्नई रेकॉर्ड ब्रेक प्ले ऑफ खेळण्याची अशी काही रेसिपी नाही. तुम्ही चांगले खेळाडू निवडण्याचा प्रयत्न करता. त्यांना योग्य असा स्लॉट देण्याचा प्रयत्न करता. तुम्ही त्यांचा अशा पद्धतीने वापर करता की ते जास्तीजास्त यशस्वी होतील. ते ज्या विभागात कमकूवत आहेत त्या विभागात त्यांना तायर केले जाते.'

धोनी पुढे म्हणाला की, 'जर तुम्ही जे संघासाठी योग्य आहे ते करत असलात तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात. आमचे संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफ भारी आहे. ते काम आम्हाला सांगत असतात की काही काळजी करू नका जे तुम्ही करत आला आहे ते करत रहा. मात्र खेळाडू देखील तितकेच महत्वाचे आहेत.

दर्जेदार खेळाडूंच्या निवडबद्दल विचारल्यावर धोनी म्हणाला की, 'तुम्हाला अशा खेळाडूंची गरज असते जे आधी संघाचं हित पाहतात. अशा प्रकारचे खेळाडू आम्ही पाहत असतो. लांब राहून असे खेळाडू हेरणे अवघड असते. आम्ही खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. जर खेळाडू एक पाऊल पुढे येत असेल तर आम्ही 5 पावले पुढे येतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT