MS Dhoni Knee Injury CSK  esakal
IPL

MS Dhoni CSK : 11 सेकंदाचा तो VIDEO... धोनीला अलविदा म्हणण्याची वेळ आली?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Knee Injury CSK : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या 16 व्या हंगामात आपल्या जुन्या स्टाईलमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. तो सहसा स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजीला येतोय आणि चौकार, षटकारांमध्येच खेळतोय. मात्र धोनी असं का करतोय याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत!

महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. या व्हिडिओत त्याला धावताना किती त्रास होतोय याची जाणीव होत आहे. धोनीचा असा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांचे ह्रदय पिळवटून निघत आहे. धोनीचा हा 11 सेकंदाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनीचा हा शेवटचा हंगाम तर नाही अशी शंका चाहत्यांच्या मनात आल्या वाचून राहणार नाही.

धोनीच्य नावाने एक फॅन पेज चावलणाऱ्या सोशल अकाऊंटवर धोनीच्या रनिंगची तुलना केली आहे. आधी धोनी 22 यार्डचे अंतर चित्याच्या वेगाने पार करत होता. मात्र आता सरावावेळी धोनी धाव घेताना चांगलाच लंगडताना दिसतो. या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली की, 'आपल्याला धोनीला खेळताना पाहणे खूप आवडते मात्र आता त्याला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे.'

आयपीएल 2023 च्या काही सामन्यात धोनीला फिल्डिंग करताना आणि पळताना वेदना होत असल्याचे दिसत होते. सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी जरी धोनी दुखापतग्रस्त असलात तरी स्पर्धेतील सर्व सामन्यात उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले. धोनीने आपल्या दुखापतीची कोणतीही माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT