Rohit Sharma | MS Dhoni | Sachin Tendulkar Sakal
IPL

Rohit Sharma Retirement: धोनी आणि सचिनने रोहितला विचारला रिटायरमेंटचा प्लॅन? हिटमॅनने दिलं थेट उत्तर

Rohit Sharma, MS Dhoni, Sachin Tendulkar: सोशल मीडियावर एका जाहिरातीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ज्यात रोहित शर्माला त्याच्या निवृत्तीबद्दल सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी विचारत आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma, MS Dhoni, Sachin Tendulkar: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सुरू आहे. याचदरम्यान एक जाहिरात समोर आली आहे, ज्यात रोहित शर्मा, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर हे एकत्र दिसत आहेत. त्यामुळे सध्या या जाहिरातीची मोठी चर्चा होत आहे.

ही जाहिरात म्युचूएल फंडची असून यामध्ये रोहितच्या विसरण्याच्या सवयीचा वापर करण्यात आला आहे. या जाहिरातीत दिसते की रोहित आणि धोनी एका रेस्टॉरंटमध्ये बसले असून नंतर तिथे एक फोन घेऊन सचिनही येतो.

त्या फोनचे रोहित कौतुक करत असताना सचिन त्याला सांगतो की हा तुझाच फोन आहे, जो तू बसमध्ये विसरून आला होता. त्यानंतर ते निवृत्तीबद्दल चर्चा करत आहे.

यावेळी धोनी सचिनला असंही म्हणतो की निवृत्तीचा विचार तर आपली पिढी करायची आत्ताची पिढी त्याचा विचार करत नाही. पण त्याला लगेचच रोहित उत्तर देतो की असं नाहीये पहिल्या सामन्यापासूनच निवृत्तीच्या योजनांचा विचार करून ठेवला आहे.

दरम्यान, या जाहिरातीत भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज एकत्र आल्याने या जाहिरातीची मोठी चर्चा होत आहे. अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांचे फोटोही व्हायरल होत आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सचिनने 2013 मध्येच सर्वचप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण धोनी त्यानंतर आयपीएलमध्ये खेळला आहे.

आता 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आल्यानंतर धोनी पुन्हा घरी परतला आहे. त्यामुळे आता धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही, याबाबत मात्र त्याने मौन बाळगले आहे.

दरम्यान, रोहित अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्येही सक्रिय आहे. तो भारतीय संघाचा तिन्ही क्रिकेट प्रकारात कर्णधार आहे, तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईलाही आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT