MS Dhoni IPL CSK  esakal
IPL

MS Dhoni IPL 2024 : आयपीएलमुळं मला संधी मिळाली... 'न्यू रोल' ट्विटनंतर धोनीची अजून एक प्रतिक्रिया

MS Dhoni IPL CSK : धोनीने 2008 पासून अनेक विदेशी खेळाडूंना पाहिलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज खेळाडू देखील खेळले आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni IPL 2024 : महेंद्र सिंह धोनीने काल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि चाहत्यांच्या पोटात गोळा आला. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या नव्या पोस्टनंतर आता त्याची मुलाखत व्हायरल होत आहे. आयपीएलचा सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती याबाबत धोनीने आपले मत व्यक्त केलं आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट कोणती या प्रश्नाचं उत्तर धोनीपेक्षा दुसरा कोणी चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही. कारण धोनीने 2008 पासून आयपीएलचा प्रत्येक हंगाम जवळून पाहिला आहे. संघाचं नेतृत्व केलं आहे. तो आयपीएलच्या सुरूवातीपासून ते ती जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग होईपर्यंतचा प्रत्येक प्रवास पाहिला आहे.

धोनीने चेन्नई सुपर किंग्जला पाचवेळा विजेतेपद पटकावून दिलं आहे. तो चेन्नईचे 2024 मध्ये देखील नेतृत्व करण्याची शक्यता आहे. (जर त्यानं निवृत्ती घेतली नाही तर)

धोनीने आयपीएल 2024 पूर्वी स्टार स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली. त्यात त्याने आयपीएलच्या प्रवासाबद्दल मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, '2008 मध्ये चेन्नईची जी टीम खेळली ती टीम सर्वात समतोल होती. आमच्याकडे अनेक अष्टपैलू खेळाडू होते. संघात मॅथ्यू हेडन, माईक हसी, मुथय्या मुरलीधरन, मखाय एन्टिनी, जेकब ओरम असे खेळाडू होते.'

'हे सर्व विदेशी खेळाडू एकाच ड्रेसिंगरूममध्ये होते. त्यामुळे प्रत्येकाला जाणून घेणं एक आव्हान होतं. ज्यावेळी तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्व करता त्यावेळी तुम्हाला प्रत्येक खेळाडूबद्दल माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू लागता त्यावेळी तुम्हाला त्याची ताकद आणि उणीव माहिती होते. यामुळे संघला योग्य दिशेत पुढे घेऊन जाणे सोपे होते.'

महेंद्रसिंह धोनी पुढे म्हणाला की, 'आयपीएलने मला अनेक विदेशी खेळाडूंना समजून घेण्याची संधी दिली. मी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी सातत्याने संवाद साधणारा व्यक्ती नाहीये. मात्र आयपीएलमुळे मला इतर खेळाडूंनाही जाणून घेण्याची संधी मिळाली. ते क्रिकेटबद्दल कशा पद्धतीने विचार करतात. त्यांचे कल्चर कसे आहे हे जाणून घेता आलं. यामुळेच आयपीएल खूप लक्षवेधी ठरते.'

(IPL Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT