MS Dhoni Shubman Gill Stumping VIDEO
MS Dhoni Shubman Gill Stumping VIDEO  esakal
IPL

MS Dhoni VIDEO : गिलचा तोल गेला अन् धोनीनं डाव साधला... पाहा चित्याची चपळाई

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Shubman Gill Stumping VIDEO : आयपीएलचा यंदाचा हंगाम हा धोनीचा हंगाम म्हणून ओळखला जाईल. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व स्टेडियमवर धोनी फॅन्सचाच बोलबाला होता. आज आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने पॉवर प्लेमध्येच चौकार आणि षटकारांचा धडाका सुरू केला होता. रविंद्र जडेजाने गोलंदाजीवर देखील तो धावा कुटण्याच्या इराद्यात होता. मात्र त्याचा थोडासा तोल गेला अन् चित्त्याची चपळाई लाभलेल्या धोनीने गिलचा खेळ खल्लास केला.

पॉवर प्लेमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर गिलने धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरूवात केली होती. त्याने पॉवर प्लेमध्ये 17 चेंडूत 36 धावा ठोकत संघाला 62 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र रविंद्र जडेजाने पॉवर प्ले झाल्यानंतर शुभमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात पकडले. त्याने गिलला 39 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

रविंद्र जडेजाने सातव्या षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ स्टम्पवर टाकला. हा चेंडू हलका टर्न झाला अन् गिल गोंधळला. चेंडू अडवण्याच्या नादात त्याचा तोल गेला. याचा फायदा उचलत धोनीने क्षणार्धात बेल्स उडवल्या. तोल गेल्यामुळे गिलचा मागचा पाय क्रिजच्या बाहेर गेला होता.

गिल बाद झाल्यानंतर वृद्धीमान साहाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत गुजरातला 12 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. त्याने अर्धशतकी मजल मारली. त्याला साई सुदर्शनने देखील चांगली साथ देत होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. वृद्धीमान साहाने अर्धशतकी खेळी कर गुजरातला 14 षटकात 131 धावांपर्यंत पोहचवले. अखेर त्याला दीपक चाहरने 54 धावांवर बाद केले.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT