MS Dhoni update csk head coach stephen fleming on ms dhoni not playing ipl 2024
MS Dhoni update csk head coach stephen fleming on ms dhoni not playing ipl 2024  
IPL

MS Dhoni : धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

रोहित कणसे

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केलं आहे. त्याच्या विधानांवरून तो पुढील आयपीएल सीझनमध्ये खेळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तो खेळाडू म्हणून पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याची देखील चर्चा होत आहे.

दरम्यान चेन्नई सुपरकिंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मात्र यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, धोनीने रिटायरमेंटचे कुठलेही संकेत दिलेले नाहीयेत. धोनी इंटरनॅशनल क्रिकेट मधून १५ ऑगस्ट २०२० मध्ये सन्यास घेतला आहे. मात्र त्यानंतर तो फक्त आयपीएल लीगमध्येत खेळतो आहे.

जेव्हा फ्लेमिंग यांना विचारण्यात आलं की धोनी रिटायरमेंटबद्द काही सांगितलं आहे का, याचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, नाही, असे कुठलेही संकेत धोनीने दिले नाहीत. दरम्यान कोलकता नाईट रायडर्सविरोधात सीएसके ने जेव्ह इडन गार्डन्स मैदानावर मागचा सामना खेळला तेव्हा धोनीने मॅचनंतर सांगीतले होते की, मी मला मिळालेल्या सपोर्टसाठी आभार मानू इच्छितो. इथे मला सपोर्ट करण्यासाठी खूप चाहते आले आहेत. परेच लोक केकेआरची जर्सी घालून आल आहेत. या सगळ्यांना मला फेअरवेल द्यायचे आहे. इथे आलेल्या चाहत्यांचे आभार.

तसेच मागच्या सामन्यानंतर देखील धोनी म्हणाला होता की, मी माझ्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि ऐकल्या गेल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसके संघासमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, धोनी जर पुढच्या वर्षी खेळला नाही तर सीएसकेचा कर्णधार कोण असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

Fact Check : लोकसभा निवडणुकीसाठी परदेशातून मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना मदत जाहीर करणारे ते व्हायरल पत्र खोटे

संदेशखाली प्रकरणात मोठा यू टर्न! दोन पीडितांनी तक्रारी घेतल्या मागे, महिला आयोगावर केले आरोप

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल; पाच आरोपींवर चालला खटला

SAKAL Exclusive : आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमात; मे महिन्यातही एकही प्रवेश नाही

SCROLL FOR NEXT