MS Dhoni Injury Update 
IPL

MS Dhoni Injury Update : धोनी IPLच्या प्लेऑफमध्ये नाही खेळणार? CSK कोचने दिली मोठी अपडेट

प्ले-ऑफपूर्वी CSK साठी प्रमुख चिंता कर्णधार MS धोनीची दुखापत...

Kiran Mahanavar

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. प्ले-ऑफपूर्वी CSK साठी प्रमुख चिंता कर्णधार MS धोनीची दुखापत असू शकते. धोनी पळताना लंगडताना दिसत आहे आणि आता CSK प्रशिक्षक मायकेल हसीने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी हसीने सांगितले की, कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा गुडघा 100 टक्के तंदुरुस्त नाही. विशेष म्हणजे धोनीच्या गुडघ्याची समस्या संपूर्ण हंगामात समोर येत आहे. मात्र असे असतानाही त्याने विकेटकीपिंग सोडले नाही. याशिवाय त्याने अनेक सामन्यांमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये संघासाठी मोठे फटके मारून उपयुक्त धावाही केल्या आहेत.

मायकेल हसीने पुढे सांगितले की, तो डावाच्या शेवटी वेगवान खेळण्यासाठी शक्य तितक्या वेळ फलंदाजीला येण्याचे टाळतो. त्याने शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांच्यावर खूप विश्वास ठेवला आहे. दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनी रेस बिटवीन द विकेटमध्ये संघर्ष करताना दिसला होता.

चेपॉक येथे केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी तो मैदानात फिरला तेव्हाही त्याच्या गुडघ्यावर बर्फाचा पॅक होता.

डेव्हॉन कॉनवे आणि गायकवाड यांच्या शतकी भागीदारीनंतर दीपक चहरच्या तीन विकेट्सच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने शनिवारी आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करून प्लेऑफसाठी पात्र ठरले.

महेंद्रसिंग धोनीच्या शेवटच्या आयपीएलच्या अनुमानांदरम्यान त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला की ते आता त्याला प्लेऑफमध्ये देखील खेळताना पाहू शकतील. चेन्नई सध्या 14 सामन्यांतून 17 गुणांसह गुजरात टायटन्सच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT