MI vs CSK | IPL 2024 Sakal
IPL

MI vs CSK, IPL 2024: 'एल क्लासिको'पूर्वी चेन्नई-मुंबईच्या खेळाडूंमध्ये वानखेडेवर दिसला 'दोस्ताना', पाहा Video

MI vs CSK, IPL 2024: रविवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याआधी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटून चर्चा करताना दिसले आहेत.

Pranali Kodre

MI vs CSK, IPL 2024 Video: इंडियन प्रीमियर लीगमधील 'एल क्लासिको' म्हणून जो सामना ओळखला जातो, तो सामना म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात होणारा सामना.

आयपीएलच्या 17व्या हंगामात या दोन संघात रविवारी (14 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. त्यामुळे या बहुप्रतिक्षित सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघबी मुंबईत पोहचला आहे. तसेच दोन्ही संघ या सामन्यापूर्वी कठोर मेहनतही करताना दिसले आहेत. याचदरम्यान दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटले. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की मैदानात एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू वानखेडे स्टेडियमवर आपापल्या सरावादरम्यान एकमेकांशी भेटून चर्चा करत आहेत. तसेच थोडी मस्ती करतानाही दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर चर्चा करत आहेत, तर रविंद्र जडेजा आणि तिलक वर्मा हे देखील चर्चेबरोबर थोडी मस्तीही करत आहेत. दोन्ही संघांचे प्रशिक्षकही एकमेकांशी बोलताना या व्हिडिओत दिसले.

दरम्यान, सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडू आणि सदस्यांमध्ये दिसलेली मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

नव्या कर्णधारांचे नेतृत्व

दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांमध्ये नेतृत्वबदल झाले आहेत. चेन्नईचे कर्णधारपद एमएस धोनीने सोडले असून ही जबाबदारी त्याने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे.

तसेच मुंबईने रोहितच्या जागेवर हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्यामुळे आता रविवारी ऋतुराज आणि हार्दिक यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे.

चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघात अनेक रोमांचक सामने झाले आहेत. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघही आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहेत.

दरम्यान, यंदाच्या हंगामात या दोन संघात साखळी फेरीत रविवारी एकमेव सामना होणार आहे. याआधी या दोन संघात 36 सामने खेळवण्यात आले असून चेन्नईने 16 विजय मिळवले आहेत, तर मुंबईने 20 विजय मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT