Hardik Pandya Sakal
IPL

Hardik Pandya: टी20 वर्ल्डकपपूर्वीच हार्दिकचा विक पॉइंट सापडला? तीन डावात दोनदा 'या' चेंडूवर झालाय बाद

Hardik Pandya: आगामी टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने हार्दिकचा खराब फॉर्म हा फक्त मुंबई इंडियन्सच नाही, तर टीम इंडियासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. प्रत्येक संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. अशात काही संघांना प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे, या संघांमध्ये 5 वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे.

मुंबईला यंदा त्यांच्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तसेच मुंबईला सध्या संघाच्या कामगिरीबरोबरच नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या फॉर्मचीही चिंता आहे. खरंतर आगामी टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने हार्दिकच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर जवळपास मार्च २०२४ पर्यंत हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यातच त्याला आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. त्यामुळे हार्दिक आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

मात्र अद्यापतरी मुंबईच्या ८ सामन्यांनंतरही हार्दिकला वैयक्तिक कामगिरीने छाप पाडता आलेली नाही.

हार्दिकने 8 सामन्यांत अवघ्या 21.57 च्या सरासरीने आणि 142.54 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या आहेत. 39 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याला कमाल करता आलेली नाही. त्याने 8 सामन्यांत केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.

हार्दिकची कमजोरी आली समोर?

याचदरम्यान हार्दिकला कोणता चेंडू त्रस्त करत आहे, याबद्दलची एक आकडेवारीही समोर आली आहे. हार्दिक यंदाच्या आयपीएलमध्ये फुलटॉस चेंडू खेळताना काहीसा अडखळताना दिसला आहे.

त्याने 8 सामन्यांतील 3 डावात 4 फुलटॉस चेंडूंचा सामना केला असून चारच धावा केल्या आहेत. तसेच त्याची केवळ 2 सरासरी आहे. तो 3 डावात दोनवेळा फुलटॉसवर बाद झाला आहे.

एकूणच ही आकडेवारी फक्त मुंबई इंडियन्सचेच नाही, तर भारतीय संघाचेही टेंशन वाढवणारी आहे. कारण जर हार्दिकला आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात संधी मिळाली, तर फुलटॉस चेंडू त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांसाठी एक अस्त्र ठरू शकते.

कारण टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजला होणार आहे. तिथे वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या असण्याची शक्यता आहे.

टी20 वर्ल्डकप 2 जून पासून 29 जूनपर्यंत खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून 1 मेपर्यंत प्राथमिक संघ घोषित करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे एप्रिलच्या अखेरीस भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT