mumbai indians coach-mark-boucher-statement-on-rohit sharma
mumbai indians coach-mark-boucher-statement-on-rohit sharma  
IPL

Mumbai Indians: 'रोहित शर्माचे कर्णधारपद...' पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या कोचच्या वक्तव्यानंतर खळबळ

Kiran Mahanavar

Mumbai Indians Rohit Sharma : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता हा संघ 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध या हंगामातील विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवावर संघाच्या प्रशिक्षकाने मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सामन्यानंतर सांगितले की, संघाने या हंगामात चांगले क्रिकेट खेळले आहे, जे आम्हाला भविष्यात मदत करेल. रोहित हा महान खेळाडू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. आमची फलंदाजी चांगली होती. कर्णधारपदही उत्कृष्ट होते. 2017 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये सामना गमावला आहे. शेवटच्या वेळी 2017 मध्ये मुंबई रायझिंगचा पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात पराभव झाला होता.

शुभमन गिलने कातील फलंदाजी करताना या मोसमातील तिसरे शतक झळकावले. त्याने अवघ्या 60 चेंडूत 129 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 10 मोठे षटकारही निघाले. या शतकासह तो आता आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 60.79 च्या अत्यंत धोकादायक सरासरीने आणि 156.43 च्या स्ट्राईक रेटने 851 धावा केल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या 129 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईला विजयासाठी 234 धावांचे लक्ष्य दिले. गिलशिवाय साई सुदर्शनने 43 तर कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद 28 धावा केल्या.

प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.2 षटकांत सर्वबाद 171 धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्सकडून केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. यामध्ये सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत 61 तर टिळक वर्माने 14 चेंडूत 43 धावा केल्या. मोहित शर्माने केवळ 2.2 षटकात 10 धावा देत 5 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT