Mumbai Indians Ishan Kishan 6 match each Run Cost esakal
IPL

इशान किशनच्या एका धावेची किंमत तब्बल 3.15 लाख रूपये

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) पाच वेळा आयपीएल आपल्या खिशात टाकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अत्यंत खराब सुरूवात झाली आहे. 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाचा चेहरा मोहराच बदलून गेला. मुंबईने यंदाच्या लिलावात आपलाच जुना खेळाडू इशान किशनला (Ishan Kishan) तब्बल 15.25 कोटी रूपये खर्चून पुन्हा गोटात ओढले होते. ही त्यांची सर्वाच महागडी खरेदी ठरली. मात्र यंदाच्या हंगामात इशान किशनची बॅट काही केल्या तळपण्याचे नाव घेत नाहीये.

मुंबई इंडियन्सने इशान किशनवर 15 कोटीच्या वर बोली लावली खरी मात्र आतापर्यंतच्या सहा सामन्यात इशान किशनने 38.20 च्या सरासरीने 191 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. प्रत्येक संघाला 14 सामने खेळायचे आहेत. यंदा मुंबई इंडियन्स प्ले ऑफ गाठेल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे इशान किशनची एक धाव किती रूपयाला पडेल याचा हिशेब लावण्यासाठी 14 सामन्यांचाच आधार घेऊयात. 14 सामन्याचा विचार केला तर त्याला प्रत्येक सामनाला 1 कोटी 8 लाख रूपये मिळाले असे आपण गृहीत धरू. आतापर्यंत त्याने सहा सामने खेळले आहेत. त्या आधारावर त्याला 6.8 कोटी मिळाले आहेत असे मानले तर त्याने केलेल्या प्रत्येक धावेची किंमत (Ishan Kishan Each Run Cost) ही 3 लाख 15 हजार इतकी होईल.

आयपीएलच्या बाजारात कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्यामुळे इशान किशनचा खेळ बिघडला का असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉट्सनने मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापानावर टीका केली होती. त्याच्या मते इशान किशनची 15.25 कोटी रूपये देण्याची लायकी नाही. तसेच जोफ्रा आर्चरला देखील 8 कोटी देण्याचा निर्णय त्याला पटलेला नाही. सर्वांना माहिती होते की आर्चर यंदाचा हंगाम खेळणार नाही. तरी मुंबईने इंग्लंडच्या या वेगावान गोलंदाजाला लिलावात खरेदी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : राज्यसभेसाठी नामनिर्देशन केल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो - उज्ज्वल निकम

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT