mumbai indians support staff trolled rohit sharma 
IPL

चाहते तर सोडा, रोहितला मुंबईचा सपोर्ट स्टाफ सुद्धा करतोय ट्रोल - Video

रोहित शर्मा सराव सत्रादरम्यान थ्रो-डाउन करत असताना संघाच्या सपोर्ट स्टाफने त्याला केले ट्रोल टीमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केला व्हिडिओ शेअर

Kiran Mahanavar

IPL 2022: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची (MI) एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती. मुंबईने आत्तापर्यंत 8 सामने खेळले असून एकही सामना जिंकता आला नाही. कर्णधार रोहित शर्मावर प्रश्न उपस्थित केले जात आहे, त्याचा फलंदाजीचा फॉर्म खराब होत चालला असून तसेच कर्णधारपदावरही तो काही विशेष कामगिरी करताना दिसत नाही. दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सराव करताना गोलंदाजी करत आहे.

मुंबई इंडियन्सने एक मजेदार व्हिडिओ पोस्ट शेअर आहे. टीमचा सपोर्ट स्टाफ रोहित शर्माला ट्रोल करत आहे. रोहित शर्मा सरावाच्या वेळी थ्रो-डाउन करत होता. मग तो म्हणाला की आता यॉर्कर बॉल टाकतो, रोहितने गोलंदाजी करताना शॉर्ट पिच टाकली. ज्यावर सपोर्ट स्टाफने त्याचे मजा घेतली. तयावर रोहितला बोले की थोडासा वाचला. ज्यावर रोहितही हसला गेला. एवढेच नाही तर चाहत्यांनी खालील कमेंटमध्ये आठवण करून दिली आहे. हा तर नो-बॉल पण आहे. रोहित शर्माचा पाय बॉलिंग क्रिझच्या बाहेर पडला आहे. माझे सर्व मित्र विषारी आहेत या ट्रेंडशी जोडलेली ही अप्रतिम रील मुंबई इंडियन्सने पोस्ट केली आहे.

आयपीएलच्या इतिहास रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. पण यावेळी त्याचे नशीब तिला साथ देत नाही, मुंबई इंडियन्सने पहिले आठ सामने गमावले आहे. हंगामातील पहिले आठ सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संघाच्या अशा कामगिरीवर रोहित शर्माने एक भावनिक संदेशही शेअर केला आहे. आम्ही या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होत राहते. क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज या टप्प्यातून बाहेर पडले आहे, परंतु मला माझा संघ आणि तेथील वातावरण आवडते. मी आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि संघाप्रती अतूट निष्ठा दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT