Mumbai Indians esakal
IPL

Mumbai Indians : रोहित शर्मानं केएल राहुलला दिला धक्का; मोठा मासा स्वस्तात लावला गळाला

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचाने लखनौ सुपर जायंट्सचा एक चांगला खेळाडू आपल्या गळाला लावला आहे. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज रोमारियो शेफर्डला मुंबईने आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सशी ट्रेड केलं आहे. शेफर्डने 4 आयपीएल सामने खेळले आहेत. त्याने लखनौ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळला आहे. आता मुंबईने त्याला 50 लाखात आपल्या गोटात खेचलं. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार यंदाचा आयपीएल लिलाव हा 19 डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने सांगितल्याप्रमाणे आयपीएल फ्रेंचायजींना 15 नोव्हेंबर पर्यंत ते कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार आहेत याची यादी सादर करायची आहे. त्यानंतर आयपीएल 2024 च्या लिलावासाठीच्या खेळाडूंची यादी तयार केली जाईल.

बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या लिलावाची अंतिम तारीख अजून जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 चा लिलाव हा 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. हा आयपीएल इतिहासातील परदेशात होणारा पहिलाच लिलाव असेल. यंदाच्या लिलावात प्रत्येक संघाकडे 100 कोटींची पर्स असणार आहे.

मिनी लिलावासाठी पंजाब किंग्जकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. त्यांच्या पर्समध्ये 12.20 कोटी रूपये शिल्लक असून सर्वात कमी रक्कम (0.5 कोटी) ही मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये शिल्लक राहिली आहे.

कोणाच्या पर्समध्ये किती?

  • मुंबई इंडियन्स - 0.5 कोटी

  • सनराईजर्स हैदराबाद - 6.55 कोटी

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - 1.75 कोटी

  • राजस्थान रॉयर्स - 3.35 कोटी

  • चेन्नई सुपर किंग्ज - 1.5 कोटी

  • गुजरात टायटन्स - 4.45 कोटी

  • दिल्ली कॅपिटल्स - 4.45 कोटी

  • लखनौ सुपर जायंट्स - 3.55 कोटी

  • कोलकाता नाईट रायडर्स - 1.16 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT