Dropped Catch Rohit Sharma Reaction esakal
IPL

Dropped Catch MI vs RCB : डॉली कॅचही सोडले! जॉन्टी गेल्यापासून मुंबईची पोरं रोहितला डोकंच धरायला लावतात

अनिरुद्ध संकपाळ

Dropped Catch Rohit Sharma Reaction : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कधी नव्हे तेव्हा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न खुद्द मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीच हाणून पाडला. यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला डोके धरून बसण्याशिवाय कोणता पर्यायच उरला नाही.

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना आरसीबीची अवस्था 2 बाद 16 धावा अशी केली होती. विराट कोहली 1 धाव करून बाद झाला होता. मात्र विराट कोहलीवर ही वेळ आलीच नसती जर बेरनडॉर्फच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर वधेराने फाफ ड्युप्लेसिसचा सोपा झेल सोडला नसता.

बेहरनडॉर्फच्या चेंडूवर फ्लिक करण्याच्या नादात फाफ ड्युप्लेसिसिने चेंडू हवेत खेळला आणि तो थेट वधेराच्या हातात गेला. मात्र वधेराला हा सोपा झेल पकडता आला नाही अन् फाफ ड्युप्लेसिसला जीवनदान मिळाले. जरी पुढच्याच चेंडूवर बेहरनडॉर्फने विराट कोहलीला 1 धावेवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले असले तरी ड्युप्लेसिसचा कॅच फारच महागात पडला. त्याने 41 चेंडूत 65 धावा चोपल्याच पण ग्लेन मॅक्सवेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची शतकी भागीदारी रचत आरसीबीला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला.

बर मुंबईचे खेळाडू इथंपर्यंतच थांबले नाहीत. सामन्याच्या 17 व्या षटकात देखील अशीच मोठी चूक केली. ड्युप्लेसिस आणि मॅक्सेवलच्या तडाख्यातून बेहरनडॉर्फने कसे बसे मुंबईला सावरले. आरसीबीचा निम्मा संघ गारद झाला होता. शेवटच्या 5 षटकात दिनेश कार्तिक आणि केदार जाधव धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात होते.

त्यातच ख्रिस जॉर्डनने आपल्या स्लोवर वनवर कार्तिकला चांगलेच गंडवले होते. चेंडू उंच हवेत उडाला. मात्र लाँग ऑनला उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीनने कार्तिकचा डॉली कॅच सोडला. त्याच कार्तिकने 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 च्या जवळ पोहचवले. नाही हा झेल पकडला गेला असता तर मुंबईला मुंबईला अतिरिक्त 20 धावा कराव्या लागल्या नसत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT