Rohit Sharma | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: 'खूप मेहनत करत होता पण दुर्दैवाने...', पहिला विजयानंतर कर्णधार रोहित म्हणाला

दिल्लीचा हंगामाचा सलग चौथा पराभव, कर्णधार रोहित शर्माला सामनावीर ठरला

Kiran Mahanavar

IPL 2023 : आयपीएल 2023 चा 16 वा सामना दिल्ली आणि मुंबई यांच्यात खेळला गेला आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. हा सामना सुरू होण्यापूर्वी हे दोन्ही संघ या मोसमातील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात होते, ज्यामध्ये मुंबईला यश मिळाले.

या सामन्यासाठी रोहित शर्माची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्लेअर ऑफ द मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, इतक्या दिवसांनी चांगली खेळी खेळताना खूप छान वाटले. आमचा संघ पहिल्या सामन्यापासून खूप मेहनत करत होता, पण दुर्दैवाने आम्हाला निकाल मिळत नव्हता. आम्हाला माहित आहे की फक्त एका विजयाने काहीही होणार नाही, परंतु तरीही पहिला विजय विशेष आहे. फलंदाजीत पॉवरप्लेचा पुरेपूर वापर करण्याचा मी प्लॅन बनवला होता आणि सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकून भागीदारी करण्याचा प्रयत्न केला होता.

दिल्ली संघाला आपला नियमित कर्णधार ऋषभ पंतची खूप उणीव भासत आहे, कारण त्याच्या जागी कर्णधार म्हणून आलेला डेव्हिड वॉर्नर धावा करत आहे पण अतिशय संथ गतीने. या सामन्यातही असेच काहीसे घडले आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीचा संघ 19.4 षटकात 172 धावांवर सर्वबाद झाला.

मुंबई इंडियन्सने फलंदाजीत दमदार सुरुवात केली. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर 16व्या षटकात मुंबई संघाने सलग दोन चेंडूंत 2 विकेट गमावल्याने चौथी विकेटही 143 धावांच्या धावसंख्येवर पडली. त्यानंतर दिल्लीने शानदार पुनरागमन केले, पण मुंबईच्या कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिडने 19व्या षटकात 15 धावा केल्या, शेवटच्या षटकासाठी फक्त 5 धावा हव्या होत्या.

दिल्लीचा गोलंदाज नोर्खियाने शेवटच्या षटकात जवळपास 5 धावा बचावल्या, पण शेवटी टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात दोन धावा काढून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून रोहित शर्माने 45 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय इशान किशनने 26 चेंडूत 31 धावा केल्या आणि तिलक वर्माने 29 चेंडूत 41 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT