muttiah muralitharan angry sakal
IPL

...अन् हसतमुख मुरली रागाने लाल झाला

मुथय्या मुरलीधरन डगआउटमध्ये संयम गमावताना दिसला

Kiran Mahanavar

IPL 2022: आयपीएलच्या 40 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला. दोन महत्त्वाचे गुण मिळवत गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. सामन्याच्या 19 व्या षटकापर्यंत हैदराबादचा संघ विजयी दिशेने होता. पण 20 व्या षटकात रशीद खान आणि राहुल तेवतियाने मार्को जेनसनला 4 षटकार ठोकत गुजरातला सामना जिंकून दिला. मात्र जेन्सन शेवटच्या षटकात सिक्स मारत असताना हैदराबादच्या डगआऊटवर चाहत्यांनी आजपर्यंत कधीही न पाहिलेले दृश्य पाहायला मिळाले. असे घडले की जेन्सनच्या षटकात रशीद खान आणि राहुल तेवतिया सिक्स मारत होते, तेव्हा हैदराबादचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन डगआउटमध्ये आपला संयम गमावताना दिसला.(Muttiah Muralitharan Angry)

राशिद खानने षटकार मारताच मुरलीधरन चिडताना दिसतो. खुर्चीवरून उठला आणि 'व्हाई द हेल तो फुल बॉलिंग करतोय' असं बोलताना दिसला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली. मात्र मुरलीधरनचे हे भयंकर रूप तुम्ही याआधी कधीही पाहिले नव्हते. मुरलीधरनला राग आल्याचा व्हिडिओ खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरातने सामना जिंकला आहे. मात्र हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 135 कोटींची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सामन्यात उमराण वगळता एकाही गोलंदाजाला हैदराबादची विकेट घेता आली नाही. या उत्तम कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बनावट FIF, CBI नोटीस आणि Supreme Court ची कागदपत्रे... ज्येष्ठ नागरिकाची १.४७ कोटींची सायबर फसवणूक कशी झाली?

Latest Live Updates Marathi: पाच कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचे अपहरण; मुख्य अभियंत्याच्या चालकासह चौघे जेरबंद

Privacy Risk : धक्कादायक खुलासा! मोबाईल, लॅपटॉप काही सेकंदांनी घेतोय सिक्रेट स्क्रीनशॉट; सुरक्षा धोक्यात, लगेच बंद करा 'ही' सेटिंग

तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर कोण? वैभव सूर्यवंशी नाही तर दुसराच खेळाडू रोहितचा उत्तराधिकारी, सेहवागने सांगितलं नाव

अरे जा आता गप्प... T20 मुंबई लीगमध्ये राडा, बॉलरने मग काढला वचपा... VIDEO

SCROLL FOR NEXT