Naveen ul Haq LSG vs MI  esakal
IPL

Naveen ul Haq LSG vs MI : नवीनने मुंंबईचे स्टार बॅट्समन केले गार मात्र एकटा वधेरा शेवटपर्यंत भिडला

अनिरुद्ध संकपाळ

Naveen ul Haq LSG vs MI : प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्यापासून आक्रमक खेळणाऱ्या मुंबईला नवीन उल हकने मुंबईचे रोहित शर्मा, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची शिकार केली. मात्र मुंबईचा इम्पॅक्ट प्लेअर नेहाल वधेराने 12 चेंडूत 23 धावा चोपत मुंबईला 182 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईकडून ग्रीनने सर्वाधिक 41 तर सूर्याने 33 धावांचे योगदान दिले. तिलकनेही 26 धावा करून हातभार लावला.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी 3 षटकात 30 धावा ठोकल्या. इशान किशन आक्रमक फलंदाजी करत होता तर रोहित शर्मा त्याला सावध साथ देत होता. मात्र चौथ्या षटकात नवीन उल हकने 10 चेंडूत 11 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

सामन्याच्या चौथ्या षटकात रोहित शर्मा 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात इशान किशनला यश ठाकूरने 15 धावांवर बाद केले.

रोहित आणि इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी मुंबई इंडियन्सचे रनरेट खाली येऊ दिले नाही. सूर्यकुमारने 20 चेंडूत 33 धावा ठोकल्या तर ग्रीनने 41 धावांचे योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचत संघाला 11 व्या षटकात शतकी मजल मारून दिली.

मुंबई या दमदार सुरूवातीच्या जोगावर मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच नवीन उल हकने आधी सूर्याला आणि मग ग्रीनला बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. यानंतर टीम डेव्हिडही 13 धावांची भर घालून माघारी परतला. टीम डेव्हिड बाद झाल्यानंतर तिलक वर्माने मुंबईला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्याचीही शिकार नवीन उल हकने केली. वर्मा 21 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

नवीन उल हकने मुंबईचे चार फलंदाज बाद केल्यानंतर 19 व्या षटकात मोहसीन खानने फक्त 6 धावा देत ख्रिस जॉर्डनला बाद केले. आता शेवटचे षटक यश ठोकूरने टाकले. मात्र नेहाल वधेराने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र पुढचा चेंडू निर्धाव गेला. मात्र वधेराने पुढच्या दोन चेंडूवर एक षटकार आणि चौकार मारत मुंबईला 180 धावांच्या पार पोहचवले. मात्र शेवटच्या चेंडूवर 12 चेंडूत 23 धावा ठोकणारा वधेरा बाद झाला. मुंबईने लखनौसमोर 182 धावांचा डोंगर उभारला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT