Piyush Chawla | Mumbai Indians | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, Video: चावलानं हेडला कॅच आऊट, तर क्लासेनला क्लिन-बोल्ड करत SRH ला दिलेला धक्का; 'हा' विक्रमही केला नावावर

Piyush Chawla: मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवून देण्यात पीयूष चावलाचेही महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने हेड आणि क्लासेनची कशी विकेट घेतली पाहा.

Pranali Kodre

Piyush Chawla Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा 55 वा सामना सोमवारी (6 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला.

मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये पीयूष चावलाही आहे. चावलाने या सामन्यात मोठा विक्रमही केला आहे.

चावलाने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 33 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याने ट्रेविस हेड, हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल सामदला बाद केले.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. हैदराबादकडून ट्रेविस हेडने चांगली सुरुवात केली होती.

पण जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंभोजने अभिषेक शर्मा आणि मयंक आग्रवालला बाद केल्यानंतर मात्र मधल्या षटकांमध्ये चावलाने आपली फिरकीची जादू दाखवली.

त्याने आधी आक्रमक खेळणाऱ्या हेडला तिलक वर्माच्या हातून 48 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर 13 व्या षटकात धोकादायक क्लासेनचा 2 धावांवरच त्रिफळा उडवला. 17 व्या षटकात त्याने सामदला 3 धावांवर पायचीत केले.

चावलाच्या या तीन विकेट्समुळे तो आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्रावोला मागे टाकत पुढे गेला आहे.

त्याने गेल्याच सामन्यात ब्रावोला मागे टाकले होते, पण आता या तीन विकेट्समुळे त्याने ही आघाडी आणखी वाढवली आहे. तो या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. चावलाच्या आता 190 सामन्यांत 187 विकेट्स झाल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (6 मे 2024 पर्यंत)

  • 200* विकेट्स - युजवेंद्र चहल (155 सामने)

  • 187 विकेट्स - पीयुष चावला (190 सामने)

  • 183 विकेट्स - ड्वेन ब्रावो (161 सामने)

  • 179 विकेट्स - भुवनेश्वर कुमार (171 सामने)

  • 177 विकेट्स - सुनील नारायण (173 सामने)

  • 174 विकेट्स - अमित मिश्रा (162 सामने)

मुंबईच विजय

दरम्यान, चावलाने घेतलेल्या या विकेट्सनंतर हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पडले. त्याला हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीचीही चांगली साथ मिळाली. हार्दिकनेही 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 8 बाद 173 धावा करता आल्या.

त्यानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद 102 धावांच्या शतकी खेळीमुळे मुंबईने 17.2 षटकातच 174 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT