Praveen Kumar on Hardik Pandya Marathi News  sakal
IPL

IPL 2024 : "पैसे कमवणे ठीक पण.." आयपीएलवरून हार्दिक पांड्याला माजी क्रिकेटरने धुतले

IPL 2024 Mumbai Indians News : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघ एका नव्या कर्णधाराखाली खेळताना दिसणार आहे. | former cricketer Criticized Hardik Pandya over IPL...

Kiran Mahanavar

Praveen Kumar on Hardik Pandya News : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघ एका नव्या कर्णधाराखाली खेळताना दिसणार आहे. पाचवेळा चॅम्पियन संघाला हार्दिक पांड्याच्या रूपाने नवा कर्णधार मिळाला आहे, तर माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

मुंबई फ्रँचायझीने कर्णधार बदलण्याचे पाऊल आयपीएल 2024 मधील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हार्दिकवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवीण कुमारला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

पत्रकाराने त्याला विचारले की, 'मुंबई इंडियन्सने घाईघाईत निर्णय घेतला का? की हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय योग्य होता?

यावर प्रवीण म्हणाला की- गेल्या चार-पाच महिन्यांपासून तो क्रिकेट खेळत नाही. आयपीएलच्या काही महिन्यांपूर्वी तुम्ही जखमी झालात, तुम्ही देशासाठी खेळत नाही, तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुमच्या राज्यासाठी खेळत नाही आणि फक्त आयपीएलमध्ये खेळता. गोष्टी अशा प्रकारे चालत नाहीत. पैसे कमावणे ठीक आहे, यात काही गैर नाही. पण तुम्हाला राज्य आणि देशासाठी खेळायचे आहे आणि आता लोक फक्त आयपीएललाच महत्त्व देतात.

प्रवीण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. या माजी वेगवान गोलंदाजाने युवा खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग पेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. आणि त्यांच्या कारकिर्दीत दोन्ही समतोल राखण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT