Punjab Kings Posts Sakal
IPL

Punjab Kings: 'सरकार उठा आता', MI विरुद्धच्या सामन्यात मराठी सिनेमांचे डायलॉग! पंजाब किंग्जने घातला X वर धुमाकूळ

Punjab Kings Post: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंजाब किंग्सने सोशल मीडियावर अनेक मराठी चित्रपटातील डायलॉग वापरून मजेशीर पोस्ट केल्या होत्या, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली.

Pranali Kodre

Punjab Kings Post: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात मुल्लनपूर येथे पार पडला. गुरुवारी (18 एप्रिल) झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 9 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्यात खेळाडूंच्या मैदानातील कामगिरी जितकी चर्चा झाली, तेवढीच चर्चा पंजाब किंग्सने या सामन्यादरम्यान एक्सवर (X) केलेल्या पोस्टची झाली. पंजाबने या सामन्यातील वेगवेगळ्या परिस्थितीचे हटके अंदाजात वर्णन केले.

यावेळी पंजाब किंग्सने विविध मराठी चित्रपटातील गाजलेले डायलॉग वापरून मीमच्या स्वरुपात या सामन्यातील वेगवेगळ्या परिस्थितीत ते पोस्ट केले होते. मुंबईविरुद्ध हा सामना असल्याने पंजाबने या पोस्ट मराठीत केल्या होत्या.

यातील काही मोजक्या पोस्टबद्दल सांगायचे झाले, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पंजाब किंग्सने नटसम्राटमधील 'सरकार उठा आता' असा डायलॉग लिहिलेला फोटो शेअर केला होता, तसेच कॅप्शनमध्ये लिहिले होते की 'आली रे आली, विकेट आली'.

या सामन्यात ताबडतोड अर्धशतक केल्यानंतर सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर 'परली रे परली दादूसची विकेट परली' असा डायलॉग लिहिलेली पोस्ट केली आहे.

अखेरीस सामना रोमांचक वळणावर असताना 'इथे सगळे नखं का खातायत' असं लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, या पोस्ट पाहून अनेक युजर्सने मजा घेतली असून त्यांना अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या होत्या.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्माने 36 आणि तिलक वर्माने नाबाद 34 धावांच्या छोटेखानी खेळी केल्या. पंजाबकडून गोलंदाजीत हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 19.1 षटकात 183 धावांवरच सर्वबाद झाला. पंजाबकडून शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी चांगली झुंज दिली होती. परंतु, त्यांना संघाला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयश आहे.

शशांक सिंगने 41 धावांची खेळी केली, तर आशुतोषने 61 धावा केल्या. मुंबईकडून जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT