R Ashwin | Chennai Super Kings
R Ashwin | Chennai Super Kings Sakal
IPL

R Ashwin: 'त्यांनी विचारलं त्याला CSK संघात घेणार नाही का?', अश्विनने ऐकवला पहिल्या IPL चा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

R Ashwin News: भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. त्याने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला. तसेच याच मालिकेदरम्यान त्याने 500 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता.

त्याच्या याच यशाबद्दल तमिळनाडू क्रिकेट मंडळाने त्याचा गौरव केला आहे. याच सोहळ्यात बोलताना अश्विनने चेन्नई सुपर किंग्स संघात त्याची निवड कशी झाली, याबद्दल सांगितले आहे.

अश्विनने धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याची 2008 सालीच सीएसके निवड झाली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी सीएसके संघात मुथय्यामुरलीधरन देखील होता. अश्विनने 2009 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण केले.

जुने दिवस आठवताना अश्विन म्हणाला, 'साल 2008 मध्ये मी जॉली रोव्हर्स सीसी संघाकडून इंडिया सिमेंट्सविरुद्ध (टीएसीए फर्स्ट डिव्हिजन स्पर्धा) खेळलो होतो. त्या सामन्यात मी ६ विकेट्स घेतल्या आणि सामनावीर ठरलो.'

'त्यावेळी के श्रीकांत प्रमुख पाहुणे होते. त्यांनी माईक हातात घेला आणि ते म्हणाले, अश्विन तू खूप चांगली गोलंदाजी केली, तू चेन्नई सुपर किंग्स संघात जायला हवेस आणि मुथय्या मुरलीधरनकडून शिकायला हवे.'

'मी सीएसके संघात नव्हतो, पण मी भूकेलेला होता. त्यावेळी देशांतर्गत खेळाडूंसाठी लिलाव नव्हता. पण ते (श्रीकांत) कासीकडे (सीएसके सीईओ केएस विश्वनाथन) वळाले आणि म्हणाले, तुम्ही त्याला संघात घेणार नाही का? त्या एका वाक्याने माझे आयुष्य संपूर्ण बदलले. मला पुढच्याच दिवशी सीएसकेचा करार मिळाला.'

तसेच अश्विनने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचेही त्याला कसोटी संघातून वगळण्यापासून वाचवल्याबद्दल आभार मानले.

त्याने सांगितले की '2013 साली श्रीनिवासन यांनी मला फोन केला आणि म्हणाले, त्यांना तुला वगळायचे आहे, पण मी त्यांना सांगितलंय की तू मागच्या मालिकेत मालिकावीर ठरला आहे. त्यामुळे तुला खेळवा. त्यांनी संघाला सांगितले होते की गरज पडली, तर दोन ऑफ-स्पिनर संघात खेळवा.'

अश्विनने टीएनसीए आणि एमए चिदंबरम स्टेडियमचेही आभार मानले. त्याने म्हटले की 'या जागेने मला खूप काही दिले आहे. मी नेहमीच टीएनसीएकडे परत येत राहिल. उद्या कदाचीत मी जिवंत नसेल, पण माझी आत्मा याच जात भटकत राहिले.'

दरम्यान, अश्विनच्या या सत्कार सोहळ्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT