Rahul Tripathi SRH vs PBKS  esakal
IPL

Rahul Tripathi IPL 2023 : राहुलमुळे अखेर काव्या मारनचा चेहरा खुलला; सलग दोन पराभवानंतर अखेर हैदराबाद जिंकली

अनिरुद्ध संकपाळ

Rahul Tripathi SRH vs PBKS : अखेर हैदराबाद सनराईजर्सने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय मिळवलाच. पंजाब किंग्जने ठेवलेले 144 धावांचे आव्हान हैदराबादने 17.1 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. राहुल त्रिपाठीने 48 चेंडूत 74 धावांची दमदार खेळी केली. त्याला कर्णधार एडिन मारक्ररमने 21 चेंडूत नाबाद 37 धावा करून चांगली साथ दिली. हैदराबादच्या विजयामुळे पंजाबचा कर्णधार शिखर धवनची नाबाद 99 धावांची झुंजार खेळी मात्र वाया गेली.

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनच्या झुंजार नाबाद 99 धावांच्या जोरावर पंजाबने हैदराबादसमोर 144 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात म्हणावी तशी चांगली झाली नव्हती.

अर्शदीप सिंगने हॅरी ब्रुक्सचा 13 धावांवर त्रिफळा उडवला होता. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी यांनी संथ फलंदाजी करत विकेट टिकवून ठेवण्याचे धोरण अवलंबले. मात्र हा संथपणा अंगलट येणार असे वाटू लागल्यावर मयांक अग्रवालने आक्रमक फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न राहुल चाहरने पहिल्याच प्रयत्नात हाणून पाडत मयांकला 21 धावांवर बाद केले.

मात्र मयांक बाद झाल्यानंतर पुण्याच्या राहुल त्रिपाठीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. त्याच्या साथीला आता कर्णधार एडिन मारक्ररम आला होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान, राहुल त्रिपाठीने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. या दोघांनी आपली अर्धशतकी भागीदारी शतकात रूपांतरित करत हैदराबादला 18 व्या षटकात विजय मिळवून दिला. त्रिपाठीने 10 चौकार आणि 3 षटकार मारत 48 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. तर मारक्ररमने 21 चेंडूत 37 धावा केल्या.

तत्पूर्वी, सनराईजर्सच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्जची अवस्था 9 बाद 88 धावा अशी केली असताना पंजाबचा कर्णधार शिखर धवन एकटा भिडला. त्याने 66 चेंडू नाबाद 99 धावा ठोकत पंजाबला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत पोहचवले. शिखरने आपल्या या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले. हैदराबादकडून मयांक मार्कंडेयने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला उमरान मलिक आणि मार्को जेनसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT