IPL

VIDEO : बटलर-पडिक्कलचे 'भाग मिल्खा भाग'; पळून मिळवला चौकार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक आश्चर्यकारक घटना घडत आहे. आज आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) सलामीवीरांनी तब्बल 4 धावा पळून (4 Runs By Running) काढल्या. जॉस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी हा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे केकेआरकडून (Kolkata Knight Riders) यावेळी कोणताही ओव्हर थ्रो झाला नव्हता. तरी बटलर आणि पडिक्कलने चार धावा पळून काढल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतलेल्या राजस्थानचे सलामीवीर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी आक्रमक सुरुवात केली. दरम्यान, उमेश यादव टाकत असलेल्या तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बटलरने कट पॉईंटला फटका मारला. या फटक्यात फारशी ताकद नसल्याने चेंडू संथ गतीने सीमारेषेकडे जात होता. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने चेंडूचा पाठलाग केला आणि त्याने अगदी अखेरच्या क्षणाला चेंडू सीमारेषा पार करण्यापासून रोखला. मात्र रोखताना चेंडू त्याने दूर फेकला. हा चेंडू परत पकडून तो थ्रो करेपर्यंत बटलर आणि पडिक्कलने पळून 4 धावा पूर्ण केल्या. म्हणजे बटलरने पळून चौकार मिळवला.

शेवटची चौथी धाव पूर्ण करण्यासाठी बटलरला डाईव्ह मारावा लागला. तो रन आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. दरम्यान, राजस्थानने केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करत 20 षटकात 4 बाद 217 धावांपर्यंत मजल मारली. जॉस बटलरने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याला संजू सॅमसनने 38 तर हेटमायरने 26 धावांची आक्रमक खेळी करून चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT