rajasthan royals celebration
rajasthan royals celebration sakal
IPL

१४ वर्षाची प्रतिक्षा संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा हॉटेलमध्ये जल्लोष- VIDEO

Kiran Mahanavar

आयपीएल क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने या विजयासह फायनल मध्ये प्रवेश केला. आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा फायनल मध्ये गेला आहे. यापूर्वी 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ चॅम्पियन बनला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी हॉटेल मध्ये जल्लोष केला.

राजस्थान रॉयल्सचा अंतिम सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सशी खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल रात्री 8 वाजता सुरू होईल. टायटन्सने क्वालिफायर-1 मध्ये रॉयल्सचा पराभव करून फायनल मध्ये गेली आहे. गुजरात टायटन्सला पहिला हंगाम खेळत असताना त्यांना चॅम्पियन बनण्याची संधी आहे, तर राजस्थान रॉयल्सने 2008 साली विजेतेपद पटकावले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा क्वालिफायर-2 मध्ये पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी हॉटेल मध्ये जाऊन जल्लोष केला. राजस्थान रॉयल्सने त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवड आहे.

राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर त्याचवेळी या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे विजेतेपदाचे स्वप्नही भंगले आहे. जोस बटलर राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले. आयपीएल 2022 हंगामात बटलरने चौथे शतक केले. यासह तो एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीसोबत बरोबरी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT