Rajasthan Royals Vs Royal Challengers Bengaluru Eliminator IPL 2024 esakal
IPL

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

अनिरुद्ध संकपाळ

Rajasthan Royals Vs Royal Challengers Bengaluru Eliminator IPL 2024 : आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एकापाठोपाठ एक विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने भरारी घेणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी मात्र दुसऱ्या टप्यात घसरली. याचवेळी या दुसऱ्या टप्यात विजयांची मालिका रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने गुंफली. उद्या एलिमिनेटर सामन्यात हे दोन संघ आमनेसामने येत असून सध्याच्या फॉर्मनुसार बंगळूर संघाचे पारडे जड आहे.

हा एलिमिनेटर सामना गमावणारा संघ बाद होणार आहे, त्यामुळे दोघांसाठी आर या पार अशीच लढाई आहे. राजस्थानसाठी ही आयपीएल चढ-उतार अशीच राहिली आहे. पहिल्या आठ सामनांमध्ये केवळ एक पराभव झाला तरी ते अव्वल स्थानावर होते;

परंतु प्ले ऑफच्या उंबरठ्यावर आल्यावर त्यांचे सलग चार पराभव झाले आहेत आणि कोलकताविरुद्धचा अखेरचा साखळी सामना पावसामुळे झाला नाही, त्यामुळे गेल्या पाच सामन्यांत त्यांना विजयापासून दूर राहावे लागले आहेत.

या तुलनेत बंगळूर संघाने मात्र कमालीची झेप घेतली आहे. सलग सहा पराभवांमुळे आव्हान संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर असताना सलग सहा सामने जिंकून फ्ले ऑफ निश्चित केले आहे. त्यामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे.

पहिल्या वहिल्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थानकडे यंदा सुरुवातीला संभाव्य विजेता संघ म्हणून पाहिले जात होते. आता मात्र उद्या होणाऱ्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर आव्हानांचा डोंगर त्यांना पार करावा लागणार आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्यांचा कमकुवतपणा उघड झाला आहे. जॉस बटलर मायदेशी परतल्यामुळे त्यांची फलंदाजीतील ताकद कमी झाली आहे. परिणामी, आता यशस्वी जयस्वाल (३४८ धावा) कर्णधार संजू सॅसमन (५०४) आणि रियान पराग (५३१) यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे; परंतु जयस्वालचा उतरलेला फॉर्म त्यांच्यासाठी चिंता करणारा आहे.

शिमरॉन हेटमायर उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, त्यामुळे मधल्या फळीला स्थैर्य येऊ शकेल. अहमदाबादच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने हे भरवशाचे फलंदाज धावा करतील, अशी राजस्थान संघाला आशा आहे, तरी या स्टेडियमवर १२ डावांत मिळून केवळ दोनदाच द्विशतकी धावा झाल्या आहेत. याचाच अर्थ अचूक टप्प्यावर मारा केला तर प्रतिस्पर्ध्यांचा डाव मर्यादेत ठेवता येतो, हे स्पष्ट होते.

विराट हुकमी एक्का

बंगळूर संघासाठी विराट कोहली हाच सर्वात मोठा हुकमी एक्का आहे. कमालीच्या फॉर्मात असलेल्या विराटने १४ सामन्यांतून सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत. उद्याच्या सामन्यातील विराट कोहलीचा पवित्रा बंगळूर संघाचे भवितव्य निश्चित करणारा ठरू शकेल.

सुरुवीताच्या सामन्यात बंगळूर संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसी अडखळत होता; परंतु दुसऱ्या बाजूला विराटच्या झंझावातामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तोही फॉर्मात आला. त्यानंतर रजत पाटीदार (पाच अर्धशतके) याच्यामुळेही बंगळूरच्या फलंदाजीला स्थैर्य मिळाले आहे.

विल जॅक्स मायदेशी परतला असला तरी दिनेश कार्तिकने मधल्या फळीत आक्रमकता दाखवली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर यांच्याकडे कमी चेंडू जास्तीत जास्त धावा करण्याची क्षमता आहे. एकूणच बंगळूरची फलंदाजीला शह देणे राजस्थानच्या गोलंदाजीसाठी तेवढे सोपे नसेल.

यश दयालवर लक्ष

डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात कमाल केली. पहिल्या चेंडूवर स्टेडियमच्या बाहेर जाणारा षटकार स्वीकारूनही त्याने धोनीला पुढच्या चेंडूवर बाद केले आणि अखेरच्या पाच चेंडूंत ११ धावांचे संरक्षण केले होते, त्यामुळे बंगळूरला प्ले ऑफ गाठता आला होता. उद्याच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवरही लक्ष असेल.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT